Take a fresh look at your lifestyle.

अनिल अंबानी यांच्या कंपनीवर ‘फ्राॅड’चा आरोप.! ‘या’ बँकेने केले जाहीर, पहा काय कारवाई होऊ शकते..?

मुंबई : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. ‘रिलायन्स होम’ आणि ‘रिलायन्स कमर्शियल फायनान्स’ या कंपन्यांमुळे आता अनिल अंबानी अडचणीत आले आहेत.

Advertisement

अंबानी यांच्या या दोन्ही कंपन्यांनी कर्नाटक बँकेकडून 160 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, कंपन्यांनी घेतलेले हे कर्ज ‘फ्रॉड’ असल्याचे कर्नाटक बँकेने जाहीर केले आहे. याबाबत बँकेने रिझर्व्ह बँकेला सूचित केले असून, त्यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

कर्नाटक बँकेने याबाबत माहिती जाहीर केली. त्यानुसार ही बँक 2014 पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करत आहोत. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत 0.39 टक्के, तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये 1.98 टक्के हिस्सा बँकेचा आहे.

Advertisement

अंबानी यांच्या दोन्ही कंपन्यांच्या कर्जांसाठी 100 टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदविली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कर्नाटक बँकेने जाहीर केले आहे.

Advertisement

दरम्यान, अनिल अंबानी यांनी ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने (Authum Investment and Infrastructure) रिलायन्स होम फायनान्स कंपनी खरेदी करण्यासाठी 2,887 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply