Take a fresh look at your lifestyle.

चार दिवस काम, मग करा नुसता आराम..! केंद्र सरकारचा नवा कामगार कायदा, पहा कामगारांचा कसा फायदा होणार..?

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे अनेकांच्या कामाचे स्वरूपच बदलले आहे. काही जण ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत, तर काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल झाल्याने कर्मचारी ऑफिसाला जात आहेत. मात्र, अनेक कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. त्यामुळे राहिलेल्या कामगारावर कामाचा ताण येत आहे. काही कंपन्या कर्मचाऱ्यांकडून 12-15 तास काम करवून घेत आहेत. सुट्टीचे तर नावच काढायला नको. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

मात्र, आता कामाची काळजी सोडून द्या. मोदी सरकार लवकरच नवा कामगार कायदा (labor law) आणणार असून, यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातील केवळ 4 दिवस काम करावे लागेल. तब्बल 3 दिवस सुट्टी मिळणार आहे. सध्याच्या नियमांनुसार आठवड्यातील 5-6 दिवस कामगारांना काम करावं लागते. ‘मनी कंट्रोल’च्या वृत्तानुसार, नव्या नियमांवर कंपनी-कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर सहमतीने निर्णय होऊ शकतो.

Advertisement

नव्या नियमांनुसार आता 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी मिळणार आहे. मात्र, आता रोजच्या कामाचे तास वाढविले जाणार आहेत. म्हणजे आता 12 तासांपर्यंत काम वाढणार आहे. आठवड्यात कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त 48 तास काम करवून घेता येईल.

Advertisement

आता 15 ते 30 मिनिटे अतिरिक्त काम (ओव्हर टाईम) गृहित धरलं जाणार असून, त्यासाठी कंपन्यांना अधिक पैसे द्यावे लागतील. सातत्याने 5 तास काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अर्धा तासाचा आराम द्यावा लागेल.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारने नवे कामगार कायदे आणले, तरी त्याची अंमलबजावणी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. याआधीच्याही नियमाची कठोर अंमलबजावणी झाली नव्हती. अनेक कंपन्या कामगारांचे शोषण करत होत्या. त्यामुळे या नव्या नियमाची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply