Take a fresh look at your lifestyle.

केवळ 13 लाखांत दिल्ली-मुंबईत घरखरेदीची संधी, ‘एअर इंडिया’च्या मालमत्ता विक्रीला..!

कर्जात आकंठ बुडालेल्या ‘एअर इंडिया’ (Air India) या विमान कंपनीने आपल्या काही मालमत्ताची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. ‘एअर इंडिया’च्या देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये फ्लॅट आणि इतर मालमत्ता (निवासी, व्यावसायिक आणि भूखंड) आहेत.

Advertisement

मालमत्ता विक्रीतून ‘एअर इंडिया’ 250 ते 300 कोटी रुपये उभाणार असल्याचे समजते. महाराष्ट्रातीलही काही शहरांमध्येही ‘एअर इंडिया’च्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांचा ई-लिलाव (Online auction) 8 जुलै 2021 रोजी सुरू होऊन 9 जुलै 2021 रोजी संपणार आहे.

Advertisement

‘एअर इंडिया’ने या मालमत्तांची प्रारंभिक बोली प्रत्येकी 13.3 लाख रुपये ठेवली आहे. ग्राहकांना जास्तीत-जास्त दीडशे कोटी रुपयांपर्यंत बोली लावता येणार आहे. लिलावातील बर्‍याच मालमत्ता यापूर्वीही अनेकदा विक्रीसाठी ठेवल्याचे समोर आले.

Advertisement

या मालमत्तांचा होणार लिलाव

Advertisement
 • मुंबई – एक निवासी प्लॉट आणि फ्लॅट
 • नवी दिल्ली – पाच फ्लॅट
 • बंगळुरू – एक निवासी प्लॉट
 • कोलकाता – चार फ्लॅट.
 • औरंगाबाद – बुकिंग ऑफिस आणि स्टाफ क्वार्टर
 • नाशिक – फ्लॅट
 • नागपुर – बुकिंग कार्यालय, एअरलाइन्स हाऊस
 • भूज – एक निवासी भूखंड
 • तिरुअनंतपूरम – एक निवासी प्लॉट
 • मंगळरू – दोन फ्लॅट

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘एअर इंडिया’ने काही शहरांत राखीव किंमत कमी केली आहे. त्यावर विशेष सवलत दिली आहे. त्यात खरेदीदारांना 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.