Take a fresh look at your lifestyle.

भारतातील सामान्यजणांना ‘ती’ गोष्ट मिळण्याची गरज; पहा नेमके काय म्हटलेय ‘द लँसेंट’ने

मुंबई : कोरोनाचा धोका आणि दुसऱ्या लाटेतील परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळेच द लँसेंट या नियतकालिकाने काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत, या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Advertisement

‘द लँसेंट’च्या सिटीझन पॅनलने या सूचना केल्या आहेत. पॅनलने म्हटले आहे, की कोरोना आजाराची स्पष्ट माहिती देणे गरजेचे ज्यामुळे गैरसमज होणार नाहीत. भारतात या मुद्द्यावर वाद सुरू आहेत. सरकार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यंची खरी माहिती देत नसल्याचा आरोप केला जात आहे. आणि या आरोपांत तथ्य असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना आजाराची स्पष्ट माहिती देणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी विशेष वैद्यकिय सुरक्षा उपकरणे उपलब्ध करुन दिली पाहिजेत. या काळात अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

Advertisement

कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर आता लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्यांनी लसीकरणाचे प्राधान्य ठरवावे. त्यानंतर लसींचा पुरवठा वाढल्यानंतर आधिक योग्य पद्धतीने कार्यवाही करता येईल. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी कोरोनाचा धोका कायम आहे. आता तर तिसरी लवकरच येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देशासाठी पुढील काही दिवस जास्तच महत्वाचे आहेत. कोरोना काळात या पद्धतीने कामकाज होण्याची गरज आहे. तरच नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत मिळेल.

Advertisement

कोरोनाचा सर्वात जास्त फटका गरीबांना बसला आहे. या संकटात कष्टकरी लोकांचे मोठे हाल झाले. त्यामुळे आता त्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे. सरकारने त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकावेत, असे या पॅनलमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्याची स्थिती सुद्धा सारखी नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. वैद्यकिय सेवा आणि औषधांच्या बाबतीत एक धोरण तयार करणे आवश्यक आहे. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यास उपचारांसाठी रोख पैशांची गरज भासू नये, यासाठी सर्वच नागरिकांचा विमा योजनेत समावेश करावा, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply