Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला; पहा फ़क़्त ८० लस दान केलेल्या बातमीचे राजकारण

दिल्ली : कोरोनाच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेला वाद आधिकच चिघळत चालला आहे. कोरोनाच्या बाबतीत मुद्दा कोणताही असो, दोन्ही देश एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. कधी तर एकमेकांची चेष्टा करण्याचाही प्रसंग येतो. त्यावेळी देखील या वादाचा प्रत्यय येतोच. आताही अशीच एक घटना घडली आहे. ज्यामुळे चीनने अमेरिकेची चेष्टा करत या देशाच्या लस पुरवठ्याच्या धोरणावर टीका केली आहे.

Advertisement

Advertisement

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी त्रिनिदाद, टोबैगो या कॅरेबियन देशांना फायजर कंपनीच्या फक्त ८० कोरोना प्रतिबंधक लस दिल्या होत्या. विशेष म्हणजे, अमेरिकी दूतावासाने याबाबत ट्विट सुद्धा केले होते. या ट्विटमध्ये म्हटले होते, की फायजरच्या एका लसीमध्ये साधारण पाच ते सहा डोस असतात. त्यामुळे या पद्धतीने लसींची मोजणी होईल, असे अपेक्षित आहे. अमेरिकेच्या या मदतीची चीनने मात्र एक प्रकारे चेष्टाच केली आहे. चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने, अमेरिकेने काम कमी आणि बाताच जास्त ही म्हण खरी करुन दाखवली आहे. अमेरिकेने केलेल्या या दानासाठी सर्वात वाईट अशा पब्लिक रिलेशन पुरस्कारासाठी निवड करता येईल, का ? अशा शब्दांत अमेरिकेच्या लस धोरणावर टीका केली आहे. याआधी मे महिन्यात चीनने या दोन्ही देशांना सिनोफार्म कंपनीच्या एक लाख लसी दान केल्या होत्या. चीनने आतापर्यंत ५३ देशांना मोफत लसी दिल्या आहेत. मात्र, या देशांना किती लसी दिल्या याची माहिती मात्र चीनने अजूनही दिलेली नाही.

Advertisement

कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर दोन्ही देशात वाद सुरु आहेत. वैक्सिन डिप्लोमसीच्या माध्यमातूनही दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. अमेरिकेने जगातील गरीब देशांनी कोरोना लसी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच चीनने आफ्रिकेतील जवळपास ४० देशांना लसी देण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर खरेच चीनने किती देशांना लसी दिल्या याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही. चीन सध्या जगातील ५३ देशांना मोफत लसी दिल्याचे सांगत आहे. दुसरीकडे मात्र, काही देशांना दुप्पट दराने लसी विकून नफेखोरी सुद्धा करत आहे. त्यामुळे चीनने लसी मोफत दिल्याचा जो दावा केला आहे, त्यावरही संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply