Take a fresh look at your lifestyle.

तर अशी होणार ‘महाबिघाडी’..! पहा राष्ट्रवादीने काँग्रेसला काय दिलेय प्रत्युत्तर..!

मुंबई : राज्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर राज्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच काही दिवसांपूर्वी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील काही जणांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही काँग्रेस ठाम असल्याचे पाहून आता राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला सूचक इशारा दिला आहे.

Advertisement

याआधी शिवसेनेनेही पटोलेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही काँग्रेस पक्षाला एक प्रकारे इशाराच दिला आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, तिघांनीही एकत्र राहिले पाहिजे. मात्र, जर कुणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावर आधिक स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, की पक्ष वाढीसाठी जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडणूक स्वबळावर लढण्याचे म्हणत असतील तर कोणत्या पक्षाची किती ताकद राज्यात आहे, हे जनतेला चांगलेच माहित आहे. सध्या ते निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हणत असले तरी प्रत्यक्षात निवडणुका आल्यानंतर वेगळा विचार केला जाऊ शकतो. एकत्रित निवडणूक लढणे तिन्ही पक्षांसाठी फायद्याचे ठरणार आहे. स्वबळाचा विचार केला नाही तर समविचारी पक्ष एकत्र राहतील.

Advertisement

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप उशीर आहे. मात्र, काँग्रेसने त्याआधीच चाचपणीस सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. येथील जिल्ह्यात कार्यकर्ता मेळावे, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य करत आहेत. पटोले यांनीच आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल, तसेच २०२४ मध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असेल असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षास इशारा दिला आहे. तर दुसरीकडे विरोधक सरकार पडणार असल्याचे सांगत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply