Take a fresh look at your lifestyle.

तर ‘ती’ मोठी बातमी असेल..; राहुल गांधीनी मोदी सरकारवर केलीय जोरदार टीका

दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. या मुद्द्यावर विरोधक मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये त्यांनी इंधनाच्या दरवावाढीच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे की एखाद्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नाही तर ती जास्त मोठी बातमी होते.’ राहुल गांधी यांनी याआधी अनेक मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाबाबत काही सूचना त्यांनी केल्या होत्या. पण, सरकारने त्याकडे फारसे लक्ष दिले नाहीत, तरी देखील राहुल गांधी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. देशात आज इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी विरोधक करत आहेत.या मुद्द्यावर मध्यंतरी काँग्रेसने देशभरात आंदोलने केली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, पुढील काही दिवसात दर कमी होणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत. केंद्रीय मंत्रीच तसे सांगत आहेत.

Advertisement

कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. तसेच या काळात केंद्र सरकार अनेक जन कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांसाठी सुद्धा मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सध्या इंधनाच्या दर कमी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपियन देशात कोरोना आटोक्यात येत असल्याने या देशांकडून पेट्रोलियम पदार्थांना मागणी वाढली आहे या घडामोडींचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारातील या घडामोडीत बदल होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. त्यामुळे नजीकच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा कमी होणार नाहीत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply