Take a fresh look at your lifestyle.

आता काँग्रेसला ‘ते’ दोन्हीही शक्यच होणार नाही; पहा भाजपने नेमकी काय केलीय टीका

दिल्ली : काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानात रोजच राजकारण होत असले तरी भारतीय राजकारणात मात्र अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेतच नव्हता. मात्र, आता या मुद्द्यावर भारतात सुद्धा राजकारण सुरू झाले आहे. आणि यास काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कारणीभूत ठरले आहेत. दिग्विजय सिंह यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ उडाला आहे. भाजपने हा मुद्दा हातोहात उचलत काँग्रेसवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि मंत्री काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत.

Advertisement

आताही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तोमर म्हणाले, की ‘आज अवघा देश काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 बहाल करण्याच्या विरोधात आहे. दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य मात्र भारतास काँग्रेस मुक्त करण्यासारखेच आहे. आता तर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल याची कोणतीच शक्यता दिसत नाही. आणि कदाचित काँग्रेसचे सरकार आले तरी सुद्धा काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 बहाल करणे शक्यच होणार नाही.’

Advertisement

याआधी दिग्विजय सिंह म्हणाले होते, की ‘केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचा विचार केला जाईल.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र राजकारणात वादळ उठले होते. भाजपने यातील राजकारण ओळखत काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री सुद्धा काँग्रेसवर आरोपांचा भडीमार करत आहेत.

Advertisement

त्या प्रकरणी राजकारणात वादळ उठले आहे. भाजप नेते पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेसवर आरोप करत आहेत. कोरोना काळातील अपयश, कोलमडलेली अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर अडचणीत सापडलेल्या भाजपला या मुद्द्याने संधी मिळाली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते काँग्रेसवर आरोप करत आहेत. या प्रकरणावर मात्र काँग्रेस नेत्यांनी फारशा प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply