Take a fresh look at your lifestyle.

काळजी घ्या रे बाबांनो..! शेअर बाजारात ‘या’ पाच शेअरमुळे गुंतवणुदारांचे दिवाळं वाजलंय..!

नवी दिल्ली : शेअर बाजारात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ज्या कंपन्यांच्या शेअरने काही दिवसांपूर्वी गुंतवणुकदारांना मालामाल केले, आता त्याच शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने गुंतवणुदारांचे दिवाळं वाजलं आहे. त्यातही 5 असे शेअर्स आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात चुना लावलाय. असे कोणते शेअर आहेत, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

Advertisement

अदानी पाॅवर (Adani Power) : शेअर बाजारात मागील काही दिवसांत सर्वात माेठे नुकसान कोणाचे झाले असेल, तर ते अदानी ग्रुपचे..! मागील 4 व्यावसायिक सत्रांत या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड होत आहे. अदानी ग्रुप ऑफ कंपनीचे 43500 कोटी शेअर्स NSDL ने फ्रीज केल्यानंतर अदानी कंपनीच्या शेअर्सला लोअर सर्किट लागत आहे. मागील 52 आठवड्यात त्याची सर्वोच्च किंमत 166.90 रुपये, तर निच्चांकी किंमत 34.35 रुपये आहे.

Advertisement

अदानी पोर्टस् अॅड स्पेशिअल इकोनाॅमिक झोन (Adani Ports and Special Economic Zone) : मागील 7 सत्रांमध्ये अदानी पोर्ट अँड स्पेशल इकोनॉमिक झोनच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. मागील आठवड्यात या शेअरची किंमत जवळपास 13 टक्क्यांनी कमी झाली. सध्या या शेअरची किंमत 4 टक्क्यांच्या पडझडीनंतर 731 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

Advertisement

अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) : अदानी ग्रुपमधील आणखी एक कंपनी असणाऱ्या ‘अदानी टोटल गॅस लिमिटेड’च्या शेअर्सला मागील 3 सत्रांमध्ये लोअर सर्किट लागल आहे.

Advertisement

भारत हेवी इलेक्टिकल लिमिटेड (BHEL) : मागील आठवड्यात भारत हेवी इलेक्टिकल लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत 11.15 टक्के घट झालीय. सध्या या शेअरच्या किमतीत 2.90 टक्के घट होऊन 67.50 रुपये झालीय. ही घट यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

एलआयसी हाऊसिंग फायनान्स (Lic Housing Finance) : 52 आठवड्यांच्या सर्वोच्च दरावर पोचल्यानंतर ‘एलआयसी हाऊसिंग फायनान्स’च्या शेअर्समध्ये घट होताना दिसत आहे. सध्या या शेअरच्या किमतीत 4 टक्क्यांची घट होऊन 500 रुपये झालीय.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply