Take a fresh look at your lifestyle.

भारतीयांना आवडे स्विस बॅंक..! कोरोना संकटातही इतके पैसे टाकले, की 13 वर्षांचा रेकाॅर्ड मोडला..!

मुंबई : कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आली असली, तरी देशातील श्रीमंतांवर कोरोनाचा काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला. दुसरीकडे, भारतातील धनाड्यांना मात्र कोरोनामुळे काहीही फरक पडला नसल्याचे समोर आले आहे. कारण, याच काळात श्रीमंत भारतीयांनी स्विस बँकेला जवळ करताना, तब्बल 13 वर्षांचा रेकाॅर्ड मोडला आहे.

Advertisement

स्विस बँकेत पैसे जमा करण्याचा याआधीचा विक्रम 2006 मध्ये झाला होता. त्यावेळी भारतीयांनी जवळपास 6.5 अब्ज स्विस फ्रँक्स जमा केले होते. त्यानंतर 2011, 2013 आणि 2017 हे वर्षे सोडली, तर बहुतांश वर्षी यात घट झाल्याचेच समोर आले होते.

Advertisement

स्विझर्लंडच्या केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये स्विस बँकेत (Swiss Banks) भारतीयांनी सुमारे 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत. ही रक्कम मागील 13 वर्षातील सर्वाधिक आहे.

Advertisement

2019 मध्ये भारतीयांनी 89.9 कोटी फ्रँक्स (6,625 कोटी रुपये) स्विस बँकेत जमा केले होते. 2020 च्या अखेरीस ही एकूण रक्कम वाढून 20,706 कोटी रुपये इतकी झाली. त्यात 4,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कस्टमर डिपॉजिट, 3100 कोटी रुपयांपेक्षा अधिक दुसऱ्या बँकांच्या माध्यमातून, 16.5 कोटी रुपये ट्रस्टच्या माध्यमातून आणि जवळपास 13,500 कोटी रुपये बॉन्ड, सिक्युरिटीज आणि वेगवेगळ्या आर्थिक पर्यायांशी संबंधित आहेत.

Advertisement

स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेले पैसे व्यक्ती, बँका आणि एंटरप्रायजेसकडून जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम स्विझर्लंडमधील भारतीयांच्या काळ्या पैशाची नाही. त्यात भारतीय, एनआरआय किंवा इतर लोकांचं थर्ड कंट्री एंटिटीजच्या नावाने जमा होणाऱ्या पैशाचा समावेश नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply