Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मोदींनी ‘तो’ अधिकार गमावला; पहा नेमकी काय टीका केलीय सिब्बल यांनी

दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रास अपयश आल्याने कोरोना फोफावला, असा आरोप विरोधक करत असतातच. आता मात्र काँग्रेसने अधिक आक्रमक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोरोनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Advertisement

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी पंतप्रधान मोदी देशातील जनतेबरोबर नव्हते, त्यामुळे त्यांनी आता शासन करण्याचा नैतिक अधिकार सुद्धा गमावला आहे. कोरोना महामारीच्या काळात निवडणुकीत स्वतः ला श्रेष्ठ सिद्ध करण्याचाच प्रयत्न त्यांनी केला,’ असा गंभीर आरोप सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल पुढे म्हणाले, की ‘सध्या देशात राजनितीक पर्याय दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ असा नाही, की आपले भविष्य सुरक्षित आहे असा समज करून पंतप्रधानानी कर्तव्याचे पालन करणे सोडून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही सरकारने हलगर्जीपणा केला आहे. सरकारने ज्यास प्राधान्य दिले आहे ते चुकीचे आहे, तसेच सरकारला या कशाचेच गांभीर्य नाही, असेच दिसत आहे. महामारीच्या काळात लोक उपचारांसाठी दवाखान्याच्या बाहेर रांगेत उभे होते, अशा वेळी पंतप्रधानांनी लोकांना मदत करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र, त्यावेळी विधानसभा निवडणुकीत स्वतः चे राजनीतिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकडेच त्यांचे लक्ष होते,’ अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

Advertisement

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी आपल्या पक्षाच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली होती. सध्याच्या परिस्थितीत पक्षात सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच ते म्हणाले होते, की मला माहित आहे की नेमक्या समस्या काय आहेत याची माहिती नेतृत्वाला आहे. नेतृत्व लोकांचे ऐकेल, कारण ऐकून घेतल्याशिवाय काही होणार नाही. पक्षांतर्गत ज्या काही समस्या होत्या, त्या सोडवल्या गेल्या नाहीत हे सुद्धा खरे आहे. त्यामुळे निदान आता तरी या समस्या काय आहेत याची दखल घेऊन त्यांचे निराकरण केले गेले पाहिजे. पक्ष नेतृत्वाने ऐकलेच नाही किंवा ऐकणेच सोडून दिले तर  संघटना कोसळेल. जर तुम्ही ऐकलेच नाही तर मात्र वाईट परिस्थिती येईल, असा इशारा त्यांनी पक्ष नेतृत्वास दिला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply