Take a fresh look at your lifestyle.

बंगालसह ‘त्या’ राज्यातही बसणार भाजपला धक्का? पहा नेमके काय चालू आहे अंतर्गत राजकारण

दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अगदी जोरदार पराभव झाल्यानंतर या राज्यात आता भाजपला एका पाठोपाठ झटके बसत आहेत. मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात परतले आहेत. टीएमसी सोडून भाजपमध्ये आणखीही काही नेते पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. इतकेच नाही तर भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले अनेक उमेदवारांतही चलबिचल सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या राज्यात भाजपला आणखी काही झटके बसणार आहेत. बंगालच्या राजकारणाने अशा अडचणी वाढवल्या असताना शेजारच्या त्रिपुरा राज्यातील घडामोडींनीही डोकेदुखीत वाढ झाली आहे.

Advertisement

या राज्यात भाजप सत्तेत आहे. मात्र, काही दिवसांपासून मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्यावर काही आमदार नाराज आहेत. मागील ऑक्टोबर महिन्यात नाराज आमदार दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महासचिव संतोष यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, जे आमदार मुख्यमंत्री यांच्यावर नाराज आहेत यातील बहुतांश काँग्रेस आणि टिएमसीमधून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे या आमदारांना आपल्या पक्षात घेणे अन्य पक्षांना फारसे अवघड नाही. याच कारणामुळे बंगाल प्रमाणेच या राज्यातही भाजपला बंडखोरीची भिती सतावत आहे. तेव्हापासून या राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत.

Advertisement

Advertisement

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचाही येथील राजकारणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यात येथे काही फटका बसू नये, यासाठी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. या राज्यातील भाजप बंडखोरांना पक्षात घेण्यासाठी टीएमसीने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपमधून टीएमसीत आलेले मुकुल रॉय यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. या घडामोडी घडल्यानंतर भाजपनेही महासचिव बी. एल. संतोष यांना राज्यात धाडले आहे. या राज्यात आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजपसाठी हे राज्य महत्वाचे आहे. त्यामुळे  या राज्यात बंडखोरी होणे पक्षाला परवडणारे नाही.

Advertisement

पुढील वर्षात गुजरात आणि उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यात निवडणुका होणार आहे. या घडामोडींचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीआधी कोणत्याही राज्यातील नुकसान भाजपला परवडणारे नाही. असे असले तरी काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही अंतर्गत वाद वाढताना दिसत आहे. दक्षिणेतील कर्नाटक राज्यातही पक्षात वाद वाढले आहे. पक्षाचे काही आमदार मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावर नाराज आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply