Take a fresh look at your lifestyle.

गुगल धावली मदतीला; पहा भारताला कशा पद्धतीने मदत करणार ही कंपनी

दिल्ली : जगातील दिग्गज टेक कंपनी गुगलने सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात भारतास मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आणि संघटना एकत्रितपणे देशात ८० ऑक्सिजन प्रकल्प सुरू करणार आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्यासाठी ११३ कोटी रुपये निधी देणार आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात हाहाकार उडाला होता. लाखोंच्या संख्येत रुग्ण सापडत असल्याने देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नव्हता. औषधेही मिळत नव्हती. ऑक्सिजन अभावी तर अनेकांना प्राण गमवावे लागले, असे विदारक चित्र अवघ्या जगाने पाहिले. त्यानंतर मात्र या भीषण संकटात जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. जगातील अनेक देश, जागतिक संस्था, खासगी कंपन्यांनी देशास मदत केली. मदतीचा ओघ अद्यापही सुरुच आहे. आता या संकटाच्या घडीत गुगलनेही भारतास मदत करण्याचे ठरवले आहे. ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी google.org कंपनी गिव इंडियास ९० कोटी रुपये आणि अन्य एका संस्थेस १८.५ कोटी रुपये निधी देणार आहे. या व्यतिरिक ग्रामीण भागातील आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी सुद्धा कंपनी मदत करणार आहे. अपोलो मेडिकल्स द्वारे कोविड १९ व्यवस्थापनासाठी देशातील २० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी अनेक कंपन्यांनी संकट काळात देशास मदत केली आहे. या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे. मदतीचा ओघ अजूनही सुरुच आहे. युनिसेफनेही देशात ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. संस्था देशभरात ९ प्रकल्प सुरू करणार आहे. युनिसेफने भारतास जवळपास साडेचार हजार पेक्षा जास्त ऑक्सिजन कंन्सट्रेटर आणि आरटी पीसीआर तपासणी मशीन दिल्या आहेत. त्यानंतर आता गुगलने सुद्धा देशास मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

देशात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची प्रचंड कमतरता निर्माण झाली होती. याआधी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी केली गेली नाही. त्यामुळे भविष्यात कधीतरी असेही संकट येईल आणि मेडिकल ऑक्सिजनची मागणी इतकी वाढेल, याचा अंदाज कुणीही केला नव्हता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी खूप वाढली. मात्र, तितका ऑक्सजिन वेळेवर उपलब्ध करणे शक्य झाले नाही. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागली. त्यानंतर मात्र केंद्र सरकारने शहाणे होत ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यावर भर दिला आहे. रुग्णालयांचे बांधकाम करताना आधी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे. ठिकठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.