Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला आली पुन्हा झळाळी, चांदीनेही खाल्ला भाव, पाहा आजचे बाजारभाव..!

मुंबई : सोने गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय असला, तरी त्यावर व्याज मिळत नाही. गुंतवणुकदारांच्या या मानसिकतेमुळे आगामी काही दिवसांत सोन्याच्या दरात माेठ्या प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात आज (शुक्रवारी) सोन्या-चांदीचा भाव काहीसा वधारल्याने काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला.

Advertisement

सोन्याच्या दरात गुरुवारी (ता.17) माेठी घसरण झाली होती. मात्र, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) आज (शुक्रवारी) वेगळे चित्र समोर आले. बाजार उघडल्यानंतर सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आली. सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे 155 रुपयांनी वाढून 47,113 रुपयांवर गेला.

Advertisement

सोन्याच्या दरात गुरुवारी (ता.17) तब्बल 1500 रुपयांची घट झाली होती. दरम्यान, चांदीच्या दरातही आज 736 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा दर प्रति किलो 68,335 रुपये इतका झाला आहे.

Advertisement

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढीचे संकेत दिले होते. त्याचे नकारात्मक पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून आले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले.

Advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची किंमतही घसरली. रुपयाचे मूल्य गुरुवारच्या व्यवहारात तब्बल 76 पैशांनी कमजोर बनले. प्रति डॉलर 74.08 असा वर्षांतील नीचांकी स्तरावर रुपया गेला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply