Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचे पॅकेज आहे ‘डिफेक्टीव्ह’; पहा कॉंग्रेसने नेमका काय केलाय गंभीर आरोप

जयपूर : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या मुद्द्यावर आता वाद होत आहे. काँग्रेसने या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करत हे पॅकेज ‘डिफेक्टीव्ह’ असल्याचे म्हटले आहे. यामध्ये काही सुधारणा करुन मुलांना तत्काळ मदत देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली आहे. ते म्हणाले, की ‘केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजद्वारे तत्काळ कोणतीही मदत मिळणार नाही. उलट राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे.’

Advertisement

‘केंद्र सरकारने मुलांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे. ते अपूर्ण आहे. कारण, मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. सध्या फक्त शिक्षणाच्या खर्चाची व्यवस्था करण्यात येणार आहे. १८ वर्षांनंतर काय होईल, कुणास ठाऊक,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘वयाच्या २३ व्या वर्षी १० लाख रुपये मदत देणार आहे. मात्र, यामध्ये सुद्धा संशय आहे. आपण तत्काळ काय मदत देणार आहोत, याचा विचार पॅकेजमध्ये केलेला असतो. मात्र, केंद्र सरकारने तत्काळ मदत देण्याच्या दृष्टीने काहीच केल्याचे दिसत नाही. या पॅकेजमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, केंद्र सरकारला सुद्धा याचा विचार करावा लागेल,’ असे गेहलोत यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवगत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांना प्राण गमवावे लागले. घरातील कर्ती मंडळीच कोरोनाने हिरावून नेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या आजाराने हजारो मुलांचे आई-वडील हिरावून नेले. त्यामुळे आज ही मुले पोरकी झाली आहेत. त्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न आहेच. त्यामुळे अशा मुलांना मदत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारांनी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांच्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारनेही या मुलांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा मे महिन्यात केली होती. मात्र, पॅकेज जाहीर करताना केंद्राने सद्यस्थितीचा विचार केला नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पॅकेजच्या माध्यमातून संकटग्रस्तांना तत्काळ मदत देण्यावर भर असतो. मात्र, या पॅकेजमध्ये असे काहीच दिसत नाही. मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आर्थिक मदत देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तत्काळ काहीच मदत मिळणार नसल्याने विरोधकांनी केंद्राच्या या धोरणावर टीका केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply