Take a fresh look at your lifestyle.

आघाडीत ‘बिघाडी’ही जोरात; काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीला दिलेय ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई : आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येत असेल. पण, हे सोडून जनतेच्या कामांसाठी आपल्याला एकत्र यायला हवे, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील काही जणांनी आक्षेप घेतला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेना आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही काँग्रेसला सूचक इशारा दिला होता. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, तिघांनीही एकत्र राहिले पाहिजे. मात्र, जर कुणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असे पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येत असेल. पण, हे सोडून जनतेच्या कामांसाठी आपल्याला एकत्र यायला हवे, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. निवडणुकांबाबत काँग्रेसमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. जे प्रश्न निर्माण होतात त्यावर मार्गही काढण्यात येतो. संजय राऊत काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे थोरात यांनी टीव्ही ९ मराठी न्यूज चॅनेलला सांगितले.

Advertisement

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप उशीर आहे. मात्र, काँग्रेसने त्याआधीच चाचपणीस सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. येथील जिल्ह्यात कार्यकर्ता मेळावे, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तसेच राज्यातील घडामोडींवरही भाष्य करत आहेत. पटोले यांनीच काही दिवसांपूर्वी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार आहे. २०२४ मध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असेल असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय विश्वात चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या मनात काय आहे, याचा अंदाज सध्या कुणाला येत नाही. मात्र, काँग्रेसने स्वबळाचा मुद्दा उपस्थित करत निवडणुकी आधी राज्यात नव्याच चर्चा सुरू केल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply