Take a fresh look at your lifestyle.

चीनने पाकिस्तानची केलीय अशीही अडचण; पहा काय फटका बसणार भारताशेजारच्या देशाला

दिल्ली : चीनला आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही देशाचे नुकसान करण्यास काहीच वाटत नाही. चीन कोणत्याही देशाबरोबर मैत्री करताना आधी स्वार्थच पाहतो. चीनचे कुटील डाव वेळीच ओळखता न आल्याने आज अनेक देश चीनच्या जाळ्यात अडकले आहेत. सध्या भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तानही असाच अनुभव घेत आहे. चीनबरोबरील मैत्री जपण्याच्या नादात पाकिस्तानने आता आपल्याच नागरिकांना त्रास देण्याचे उद्योग सुरू केले आहेत. चीनचा डाव मात्र वेगळाच आहे. पण, पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या काही केल्या लक्षात येत नाही.

Advertisement

पाकिस्तानच्या समुद्राच्या परिसरात मासे पकडण्यासाठी चीनची अत्याधुनिक जहाजे दाखल झाली आहे. या परिसरात चीन मोठ्या संख्येने मासे पकडत आहे. त्यामुळे येथील स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांचा रोजगारच संकटात सापडला आहे. त्यामुळे या लोकांनी अनेक वेळा विरोध केला, आंदोलने केली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, चीनची जहाजे आता येथे आधिक वेगाने मासे पकडत आहेत. विकासाच्या नावाखाली पाकिस्तानने ग्वादर जवळचा समुद्राचा परिसर चीनच्या ताब्यात दिला आहे. आता चीनच येथे मालक असल्यासारखी वर्तणूक करत आहे. पाकिस्तानच्या समुद्र किनाऱ्याच्या परिसरात जवळपास २५ लाख लोक मासे पकडण्याचे काम करतात. त्यांच्या उदरनिर्वाहाचा हाच मार्ग आहे. येथील स्थानिक लोक मासे पकडण्यासाठी लहान नौकांचा वापर करतात. त्यामुळे त्यांना समुद्रात जास्त पुढेच जाता येत नाही. त्यातुलनेत चीनची जहाजे अत्याधुनिक आहेत. त्यांच्याकडे मासे पकडण्यासाठी मोठे जाळे सुद्धा आहेत, त्यामुळे ही जहाजे येथे मोठ्या प्रमाणात मासे पकडत आहेत.

Advertisement

चीन सध्या जगातील सी फूडवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. जेथे कुठे मासे पकडणे शक्य आहे तेथे चिनी जहाजे दिसत आहेत. चीनमध्ये सी फूडला मागणी खूपच जास्त आहे. त्यामुळे चीनच्या समुद्रातील मासे जवळपास संपलेच आहेत. म्हणून चीनची जहाजे आता दुसऱ्या देशात मासे पकडण्यासाठी जात आहेत. पाकिस्तानच्या समुद्राचा असाच ताबा चीनने घेतला आहे. चीनच्या या उद्योगाने स्थानिक लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. हे लोक विरोधही करत आहेत. मात्र त्याचा उपयोग होत नाही. उपयोग होईल तरी कसा, कारण,  पाकिस्तानने चीनकडून अब्जावधींचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज परत करण्याची ताकद या देशात नाही. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते चीनचा विरोध करू शकत नाही. याचाच फायदा घेत येथे चीनने मनमानी करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply