Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. त्यामुळे बसलाय तब्बल २ लाख कोटींचा फटका; पहा कोणत्या सेक्टरचे झालेय मोठे नुकसान

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन केला होता. या लॉकडाऊनचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेस बसला आहे. त्यामुळे यावेळीही नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आर्थिक वर्षात देशातील मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये (उत्पादन) २ लाख कोटींचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.

Advertisement

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत परिस्थिती आधिकच गंभीर बनली होती. रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यामुळे राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. काही राज्यांनी निर्बंध कठोर केले. त्यामुळे देशातील दैनंदीन व्यवहार थांबले होते. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेस बसला आहे. देशाचा जीडीपी सुद्धा घटला आहे. या वर्षात आर्थिक वृद्धी कमीच राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय संस्थांनीही व्यक्त केला आहे. आरबीआयने आपल्या मॉनिटरींग पॉलिसीमध्ये जीडीपीचा अंदाज कमी केला होता.

Advertisement

या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के राहिल, असेही बँकेने सांगितले आहे. याआधी मात्र जीडीपीचा वाढीचा दर १०.५ टक्के राहिल, असा अंदाज होता. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती पाहता बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज घटवला आहे. याआधी जागतिक बँकेनेही आपल्या एका अहवालात देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाजात कपात केली आहे. २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीत ८.३ टक्के वाढ होईल, असे बँकेने म्हटले होते. याआधी मात्र जीडीपीत १०.१ टक्के वाढीचा अंदाज बँकेने व्यक्त केला होता. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बँकेने सुधारीत अंदाज दिला.

Advertisement

कोरोनाचे संकट येण्याआधी देशाची अर्थव्यवस्था अतिशय भक्कम होती. त्यानंतर कोरोना आला आणि सगळीच वाताहत झाली. पहिल्या लाटेत लॉकडाऊन केले. दुसऱ्या लाटेत केंद्राने नाही पण, राज्यांनी लॉकडाऊन केले. त्याशिवाय दुसरा पर्याय त्यावेळी दिसत नव्हता. या लॉकडाऊनमुळे मात्र अर्थव्यवस्थेस फटका बसला. आर्थिक विकासाचा दर कमी झाला, जीडीपीही कमी झाला. सध्याच्या या परिस्थितीमुळे अर्थव्यवस्था वाढीचा वेग कमीच राहणार असल्याचे दिसत आहे. कारण, कोरोनाने बेरोजगारी वाढवली, उद्योग-व्यवसाय बंद केले, लहान उद्योग उद्धवस्त झाले, आरोग्यावरील खर्च वाढला, लोकांकडील पैसे कमी झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या, यांसारखी अनेक संकटे निर्माण झाली आहेत. ही संकटे दूर केल्याशिवाय अर्थव्यवस्थेचा वेग वाढणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply