Take a fresh look at your lifestyle.

अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीला मिळाला खरेदीदार, पाहा किती रुपयांना ठरलाय सौदा..?

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. कर्जाच्या बोझ्यामुळे अनिल अंबानी बिकट अवस्थेत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनी विकायला काढली होती. आता या कंपनीला खरेदीदार मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement

बिगर बँकिंग वित्तीय संस्था असणाऱ्या ‘एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने (Authum Investment and Infrastructure) रिलायन्स होम फायनान्स कंपनी विकत घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी 2,887 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून, लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला 90 टक्के, म्हणजे 2,587 कोटी रुपये एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड जमा करेल. त्यानंतर उर्वरित 300 कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने दिली जाणार आहे.

Advertisement

बँकांच्या समूहाकडून रिलायन्स होम फायनान्सच्या लिलाव प्रक्रियेला 31 मे रोजी सुरुवात झाली. येत्या 19 जूनला ही प्रक्रिया संपुष्टात येत आहे. अनेक बड्या कंपन्या ‘रिलायन्स होम फायनान्स’ विकत घेण्यासाठी पुढे आल्या होत्या. मात्र, त्यात ‘एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड’ने बाजी मारली.

Advertisement

अनिल अंबानी समूहातील रिलायन्स पॉवर कंपनीकडून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Infrastructure) कंपनीला 1325 कोटी रुपयांचे शेअर्स आणि वॉरंट जारी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 59.5 कोटी प्रिफेन्शियल शेअर्सचा समावेश आहे. रिलायन्स पॉवरकडून शेअर बाजार नियमकांना याबद्दलची माहिती देण्यात आली.

Advertisement

13 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रिलायन्स पॉवर 10 रुपयांच्या इश्यू प्राईसने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 59.5 कोटी इक्विटी शेअर्स देईल. तसेच 73 कोटी रुपयांचे वॉरंटसही इश्यू करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘रिलायन्स पॉवर’च्या डोक्यावरील कर्जाचा भार 1325 कोटी रुपयांनी कमी होणार आहे.

Advertisement

चालू आर्थिक वर्षात रिलायन्स पॉवरचे एकत्रित कर्ज 3200 कोटी रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तसेच नव्या समभागांमुळे रिलायन्स पॉवर कंपनीत रिलायन्स इन्फ्रा आणि अन्य प्रवर्तकांची भागीदारी 25 टक्क्यांपर्यंत वाढेल. रिलायन्स इन्फ्राच्या आठ लाख शेअरधारकांना याचा फायदा मिळणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply