Take a fresh look at your lifestyle.

आणि त्यामुळे कंपन्यांचे विमान आले थेट जमिनीवर; पहा नेमकी काय झालीय परिस्थिती

दिल्ली : देशातील विमान कंपन्यांना कोरोनाच्या संकटाचा जोरदार झटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन आणि संक्रमण वाढण्याच्या भितीमुळे देशांतर्गत विमान वाहतुकीत मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत विमान प्रवासात ६४ टक्क्यंपेक्षा जास्त घट झाली आहे. नागरी विमानन महानिदेशालयाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात २१.१५ लाख लोकांनी विमानांद्वारे प्रवास केला. मागील वर्षातील जुलैनंतर हा सर्वात कमी आकडा आहे.

Advertisement

दुसऱ्या लाटेत देशात हाहाकार उडाला होता. एकाच दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. त्यामुळे राज्यांनी लॉकडाऊन केले. काही राज्यांनी निर्बंध कडक केले. या काळात विमान प्रवासावर निर्बंध नव्हते. मात्र, दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक अटी होत्या. मागील वर्षात २४ मे पर्यंत देशांतर्गत विमान उड्डाणे पूर्णपणे बंद होती. त्यानंतर विमान प्रवासास परवानगी देण्यात आली. मे २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात प्रवाशांची संख्येत वाढ नोंदवण्यात आली. त्यानंतर मात्र देशात दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढत गेला आणि पुढील तीन महिन्यात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली. प्रवासीच नसल्याने अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. एअर टैक्सीने सर्वाधिक ६१.२९ टक्के उड्डाणे रद्द केली. एयर इंडियाने १६.३४ टक्के, विस्तारा ९.२९ टक्के, एयर एशिया इंडिया ३.८० टक्के, इंडिगो ३.५१ टक्के ट्रू जेट १.६४ टक्के आणि स्पाइस जेट विमान कंपनीने १.८१ टक्के उड्डाणे रद्द केली.

Advertisement

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात देशातील विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही वाढत्या महागाईने हैराण केले आहे. खाद्यतेलांच्या किमतीने तर काही वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. डाळी तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. इंधनाचे दरवाढही जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना आणखी संकटात ढकलले जात आहे. आता विमान प्रवासाचेही दर वाढवले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या करोनाच्या काळात कुणी जास्त प्रवास करत नाही. मात्र, करोना नियंत्रणात आल्यानंतर ज्यावेळी विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, त्यावेळी नागरिकांना या दर वाढीचा फटका बसणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply