Take a fresh look at your lifestyle.

भारतालाही झटका; ‘पाकिस्तानी अतिरेक्यां’नी अमेरिकन्सना गंडवले, पळवले १५८ कोटी..!

दिल्ली : भारताला डिवचणे हाच कार्यभाग बनलेल्या पाकिस्तानी सरकार आणि तेथील दहशतवादी गटाचे अनेक कारनामे वेळोवेळी उघडकीस येतात. आताही भारताच्या नावावर मदत मागून पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमेरिकन्सना गंडवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. सुमारे २३ पाकिस्तानी स्वयंसेवी संघटनांचे (एनजीओ) मोठे कारस्थान करून तब्बल १५८ कोटींचा चुना लावला आहे.

Advertisement

दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान भारताच्या मदतीसाठी अभियान चालवल्याचे भासवून ही लुट करण्यात आलेली आहे. भारतातील ऑक्सिजन संकट हा जगासमोरील मोठा प्रश्न बनला होता. त्याचाच गैरफायदा घेऊन ‘हेल्प इंडिया ब्रीद’ असे अभियान अमेरिकेत चालवण्यात आले. याद्वारे सुमारे १५८ कोटी रुपये जमवून ते थेट अतिरेक्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना मोठा झटका बसला आहे.

Advertisement

Advertisement

युराेपात दुष्प्रचार मोहिमेवर लक्ष ठेवणारी संस्था ‘डिसइन्फो लॅब’ने एक अहवाल प्रसिद्ध करून याबाबतची माहिती जगजाहीर केली आहे. ‘कोविड-१९ स्कॅम २०२१’ या अहवालात म्हटले आहे की, मदतीच्या नावाने राबवण्यात आलेले ६५ बनावट अभियान उघड झाले असून हा मानवी इतिहासातील सर्वात वाईट घोटाळ्यांपैकी एक आहे. डॉ. इस्माईल मेहर इमाना हे अध्यक्ष असलेली आणि १९६७ मध्ये स्थापन झालेल्या ‘इमाना-इस्लामिक मेडिकल असोसिएशन’ या इलिनोइसमधील संस्थेने ‘हेल्प इंडिया ब्रीद’ची योजना आखली आणि हे दुर्दैवी यश मिळवले आहे.

Advertisement

इमानाने ५.६० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे विकत घेऊन एअर इंडियासोबत करार करून भारतात साहित्य पोहोचते केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचे कोणतेही पुरावे सादर करण्याचे टाळले आहे. इमाना व इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका (आयसीएनए) यांचे संबंध जगातील अनेक अतिरेकी संघटनांशी संबंध असून त्यांच्यासह अनेक पाकिस्तानी संस्था अमेरिकेत भारताच्या मदतीच्या नावाने वर्गणी गोळा करीत आहेत. भारताशी त्यांचा संबंध नसल्याने भारत सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply