Take a fresh look at your lifestyle.

चीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते

दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी चीन अनेकदा तोंडावर पडूनही तिबेट आणि लडाख या भागात भारतीय हद्दीजवळ हिंसक डाव खेळण्यासाठी दबा धरून बसायला जागा बनवत आहे. आताही या देशाने हिमालयीन पर्वताच्या भागात असेच काही सैन्य स्ट्रक्चर उभे करून वेगळे मनसुबे असल्याचे दाखवून दिलेले आहे.

Advertisement

चिनी ड्रॅगनने समुद्रातही भारतीय सीमेवर आपली हालचाल पुन्हा सुरू करण्यासह चीनने छुप्या मार्गाने आपल्या पश्चिम सीमेवर हवाई दल वाढविणे सुरू केले आहे. भारताबरोबरचा ताण आता शिगेला असताना चीनने या हवाई तळांना बळकट करण्यास सुरवात केली आहे. चीनने आता भारतीय सीमेजवळील हवाई तळांवर अणुबॉम्बर्स आणि प्राणघातक क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. ओपन सोर्स इंटेलिजेंसच्या तज्ञांच्या मदतीने अमेरिकन संरक्षण वेबसाइट द ड्राइव्हने सांगितले की, पूर्व लद्दाखमधील गॅलवान हिंसाचारानंतर चीन आणि भारताच्या भूमिकेला एक महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

Advertisement

विशेषत: चीन आता आपल्या हवाई तळांमध्ये खूप वेगने गुंतवणूक करीत आहे. गेल्या एक वर्षात चीनने अनपेक्षित पद्धतीने भारतीय सीमेवरील हवाई घडामोडी तीव्र केल्या आहेत. या व्यतिरिक्त चीनने भारतीय विमाने खाली पाडण्याची शक्ती वाढविली आहे. अक्साई चिन ते अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत नवीन तळ, हेलिपोर्ट्स आणि रेल्वे मार्ग तयार करीत असल्याचे सॅटेलाइट प्रतिमांनी स्पष्ट केले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, चीनची ही तयारी केवळ बचावात्मक नसून त्याचा सामरिक परिणाम खूप धोकादायक ठरू शकतो. संरक्षण तज्ज्ञांनी सांगितले की, चीनने आपल्या पश्चिम सीमेवर तिबेट आणि झिनजियांग प्रांतात लष्करी पायाभूत सुविधा वेगाने वाढवल्या आहेत. यामध्ये चीनची हवाई शक्ती वाढविण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply