Take a fresh look at your lifestyle.

तयारीत राहा.. ‘त्या’ भागात मुसळधार; हवामान विभागाने दिलाय ऑरेंज अलर्ट

मुंबई : देशात मान्सून दाखल झाला असून अगदी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. आता हवामान विभागाने काही जिल्ह्यात येत्या तीन ते चार दिवसात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे. मुंबईत काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आता पुन्हा मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे.

Advertisement

राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दिवसभर ढगाळ हवामान असते. मान्सूनने सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली आहे. राजधानी मुंबईत तर पावसाने दाणादाण उडवली होती. काही दिवसांपासून येथे पाऊस झालेला नाही. मात्र, आता तीन ते चार दिवसात पुन्हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पाऊस पडल्यानंतर रस्त्यांत पाणी साचण्याची समस्या मुंबईत नेहमीचीच आहे. या समस्येवर अजूनही मार्ग निघालेला नाही. पहिल्या पावसात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पावसाळ्यातही हा त्रास कायम राहणार आहे. मुंबई व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतही चांगला पाऊस होत आहे. काही जिल्ह्यात ढगाळ हवामान असून वेगाने वारे वाहत आहेत. या जिल्ह्यात पावसाचा अंदाज नसला तरी पावसाचेच वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहेच.

Advertisement

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसात मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी उद्यापासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंदा मान्सूनमध्ये देशभरात चांगला पाऊस होईल असा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा प्रत्ययही येत आहे. सुरुवातीलाच चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता जाणवणार नाही. दरम्यान, यंदा बदललेल्या हवामानाचाही अनुभव नागरिकांना मिळाला. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. तौक्त चक्रीवाादळामुळेही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मे महिन्यात देशभरात अनेक ठिकाणी पावसाचेच वातावरण होते. त्यानंतर आता मान्सून दाखल झाला आहे. यावेळीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply