Take a fresh look at your lifestyle.

आपणही हे ‘ट्राय’ केलंय का? पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड

मुंबई : काही वर्षांपूर्वी ‘स्मार्टफोन’, ‘इंटरनेट’ हे शब्दही कुणाला माहित नव्हते. मात्र, आज या दोन गोष्टी नसतील तर… असा विचार करणे सुद्धा शक्य नाही, असा सध्याचा काळ आहे. खिशात ‘स्मार्टफोन’ नाही, असा माणूस आज क्वचितच सापडेल. नुसता फोन असून काय उपयोग, ‘इंटरनेट’ पाहिजेच ना.. त्यामुळे आज जगभरात इंटरनेट वापरकर्ते वेगाने देश, मेट्रो सिटी असो नाहीतर एखादे छोटे खेडे, सगळीकडेच इंटरनेटचे युजर वेगाने वाढत आहेत.

Advertisement

भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशात तर आजमितीस इंटरनेटचे कोट्यावधी युजर आहेत, आणि हा आकडा निरंतर वाढतच आहे. देशात स्मार्टफोनची संख्या सुद्धा प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांमध्ये सुद्धा तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. कोण अधिकाधिक वेगाने इंटरनेट स्पीड देतो, डाऊनलोडिंगचा स्पीड कोणाचा फास्ट आहे, या गोष्टींवर नेहमीच चर्चा होते, आता मात्र याचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Advertisement

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत रिलायन्स जियो कंपनीने सर्व कंपन्याना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. फोर जी सेगमेंट मध्ये 20.7 मेगाबिट प्रति सेकंद (एमबीपीएस) डाऊनलोड स्पीड देत कंपनी आघाडीवर आहे. त्यांनतर 6.7 एमबीपीएस डेटा स्पीडसह अपलोड सेगमेंटमध्ये व्होडाफोन-आयडिया कंपनी पुढे राहिली. जिओच्या फोर जी नेटवर्क स्पीडच्या तुलनेत हा स्पीड कमीच आहे. व्होडाफोन-आयडीया कंपनीचा सरासरी डाऊनलोड स्पीड 6.3 एमबीपीएस इतका होता.

Advertisement

त्यानंतर एअरटेलचा डाऊनलोड स्पीड या दोन कंपन्यांच्या तुलनेत आणखी कमी म्हणजेच 4.7 एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला.
व्होडाफोन-आयडियाची मे महिन्यात अपलोड स्पीड 6.3 एमबीपीएस इतका होता. यानंतर रिलायन्स जियोचा अपलोड स्पीड 4.2 एमबीपीएस आणि त्यांनतर एअरटेल 3.6 अपलोड स्पीड एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला. डाऊनलोड स्पीड आणि अपलोड स्पीड हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. या दोन्ही घटकांच्या स्पीडची नोंद ट्रायकडून घेण्यात येते. मे महिन्यात फोर जी डाऊनलोडींग स्पीडमध्ये जियो कंपनी टॉपवर राहिली आहे. तर अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन-आयडीया कंपनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने सुद्धा देशातील काही ठराविक शहरात फोर जी सेवा सुरू केली आहे. मात्र ट्रायच्या यादीत या कंपनीच्या नेटवर्कची नोंद घेतल्याचे दिसले नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply