Take a fresh look at your lifestyle.

कसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप.. अर्थात कसोटी क्रिकेटचा विश्वचषक अवघ्या काही तासावर आलेला असताना भारताने आपल्या अंतिम 11 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. जगभरातील क्रिकेट रसिकांच लक्ष या सामन्याकडे लागले आहे.

Advertisement

इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध हा सामना होणार आहे. भारतीय संघात दोन अनुभवी फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. अंतिम अकरामध्ये सलामीसाठी रोहित शर्माच्या जोडीला शुभमन गिल असेल.

Advertisement

शुभमन ऐवजी मयांक अग्रवाल याला संधी मिळेल, असे वाटत होते. मात्र, संघ व्यवस्थापनाने शुभमनवरच विश्वास दाखविला. त्यामुळे मयांकला बाहेर बसावे लागणार आहे.

Advertisement

या कसोटीसाठी रिषभ पंत व वृद्धीमान साहा या दोन यष्टिरक्षकांचा समावेश केला होता. त्यात अपेक्षेप्रमाणे फॉर्ममध्ये असलेल्या रिषभ पंतला संधी मिळाली. वेगवान गाेलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यावर जबाबदारी असेल.

Advertisement

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

Advertisement

दरम्यान, भारतीय वेळेनुसार शुक्रवारी (ता.18) दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय टीमने हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना फायनलसाठी निवडलेलं नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply