Take a fresh look at your lifestyle.

नेपाळमध्ये वाढल्यात अडचणी; करोनानंतर ‘त्या’ संकटांपुढे हा देश झालाय हतबल

काठमांडू : जगभरात कोरोनाने तर थैमान घातले आहेच. त्या पाठोपाठ नैसर्गिक संकटांनीही आक्रमण केले आहे. भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळ देशात असेच एक संकट आले आहे. नेपाळमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. तर दुसरीकडे देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. आणखी मुसळधार पावसाची शक्यता दिसत असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे.

Advertisement

या मुसळधार पावसाने काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक बेपत्ता झाल्याचीही माहिती मिळत आहे. मध्य नेपाळमध्ये मागील चार दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आरोग्य आणि जनसंख्या मंत्री शेर बहादूर तमांग यांनी सांगितले, की मेलम्ची आणि इंद्रावती या नद्यांना पूर आला आहे. या पुरात किमान ३० जण बेपत्ता झाले आहेत. या पुरामुळे बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. मिडीया रिपोर्टसनुसार मेलम्ची नदी किनारी असणाऱ्या गावांतील किमान ३०० झोपड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. लामजुंग जिल्ह्यात अनेक घरांत पाणी साचले आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.

Advertisement

कोरोनाचा मार सहन करणाऱ्या जगासाठी हे वर्ष सुद्धा संकटेच घेऊन आले आहे. कोरोना तर आहेच. त्याच्या जोडीला नैसर्गिक संकटे येत आहेत. कधी कोणत्या देशात चक्रीवादळे येतात, तर कुठे बर्फ वितळू लागतो, कडाक्याच्या उन्हाळ्यात मुसळधार पाऊस होतो, तर कुठे खायला अन्न सुद्धा मिळत नाही इतका भीषण दुष्काळ पडतो. जगातील या संकटांची यादी वाढतच आहे. त्यात आता नेपाळमधील पूराच्या संकटाची भर पडली आहे.

Advertisement

तसेही नेपाळमध्ये कोरोना विषाणूचेही संकट वाढत आहे. देशात रोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने निर्बंध कठोर केले आहेत. या संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसामुळे नवे संकट निर्माण झाले आहे. मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांत पाणी साचले आहे. लोकांच्या घरांचेही मोठे नुकसान होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार मार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.