Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण : आहे ‘ती’ महत्वाची अडचण; पहा नेमके काय म्हटलेय राष्ट्रवादी प्रवक्त्यांनी, आणि प्रतिक्रिया काय आहेत त्या

पुणे :  राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्याने सध्या समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यावर नेमक्या कोणत्या चुका झाल्या याबाबत चर्चा सुरू असतानाच राज्यभर आंदोलन करण्याचे नियोजन चालू आहे. याप्रकरणी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात वाकयुद्ध पेटलेले आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी ‘महत्वाची अडचण’ सांगितली आहे.

Advertisement

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी मुख्य 3 अडचणी आहेत त्याबाबत कुणी चर्चा करत नाहीत. याबाबत उत्तर शोधावे लागेल. मा.कोर्टात टिकणारा सक्षम अहवाल तयार करावा लागेल. न्या. गायकवाड आयोगाचा अहवाल मा. कोर्टात का टिकला नाही, यांचेवर अभ्यास व्हायला हवा. इतर कोणत्याही मुद्यांवर चर्चा निरर्थक ठरते असे माझे मत आहे. निराधार व भावनिक चर्चा निरुपयोगी ठरतात.

Advertisement
विलास लवांडे यांनी सांगितलेल्या अडचणी
1) देशमुख मराठा ,पाटील मराठा जे स्वतःला क्षत्रिय समजतात ते आणि सर्व कुणबी मराठा हे एकच आहेत हे अधिकृतपणे सिद्ध करावे लागेल.
2) क्षत्रिय समजणारे देशमुख ,पाटील मराठा हे #सामाजिक दृष्ट्या व #शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे अधिकृत सिद्ध करावे लागेल.
3) आरक्षणाची असलेली सध्याची 50 % ची मर्यादा वाढवणे.

 

Advertisement

यावर दिनकर शिंदे यांनी म्हटलेय, कुठल्या आरक्षण बद्दल बोलतोय हा समाज? या समाजाला सामाजिक विषमता नकोय… पण 96 कुळी वाला 92 कुळी पेक्षा भारी समजतो… पश्चिम महाराष्ट्रमधला मराठा मराठवाडामध्ये मुलगी नको बोलतो द्यायला… कसली विषमता संपवायची आहे… आरक्षण द्यायचं असेल तर मग 16 टक्केमध्ये 10 टक्के 96 कुळी, 4 टक्के 92 कुळी आणि 2 टक्के कुणबी यांना द्यायला पाहिजेत ना… असापण स्वतःला श्रेष्ठ समजतात ना 96 कुळी वाले.. जातीमध्ये.. आरक्षण येऊ नाही येऊ, लोकांची मेंटेलीटी कशी सुधारणार…

Advertisement

तर, नरेश देशमुख यांनी लवांडे यांच्या मुद्द्यांचे खंडन केले आहे. पहिल्या मुद्द्यावर त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक जातीत पोटजाती असतात. महाराष्ट्रात प्रत्येक जातीत साडेबारा पोटजाती आहेत अशी मान्यता आहे. क्षत्रिय समजणाऱ्या जाती-पोटजाती केवळ मराठा-कुणबी जातीत नसून इतरही अनेक जातीत क्षत्रिय समजणारे गट आहेत (उदा. क्षत्रिय माळी, क्षत्रिय तेली, क्षत्रिय धनगर आदी). कोण काय समजते यापेक्षा वास्तव काय आहे, हे महत्वाचे आहे. मराठा समाज क्षुद्र आहे की क्षत्रिय? ही बाब राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत घडलेल्या वैदिक-प्रकरणी व नुकत्याच पुण्यात घडलेल्या खोले-मॅडम प्रकरणावरून स्पष्ट होणारी आहे.

Advertisement

दुसऱ्या मुद्द्याबाबत नरेश देशमुख लिहितात की, गायकवाड आयोगाने, मराठा-कुणबी समाज मागास आहे ही बाब सिद्ध केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने नाकारले आहे तर त्यामागील कारण शोधून पुन्हा सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा मार्ग खुला नाही का? आणि तिसऱ्या मुद्द्याबाबत त्यांनी म्हटलेय की, महाराष्ट्रात जातीवर आधारीत 52 % आरक्षण व ews चे 10 % आरक्षण असे असल्याने 62% आरक्षण आहे. असे असतांना मराठा-आरक्षणाला 50% ची मर्यादा लावणे कितपत न्याय्य आहे? यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही का?

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply