Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण आंदोलन : आजच्या बैठकीकडे देशाचे लक्ष; ठोस निर्णयाची तरुणांना अपेक्षा

पुणे : राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलेले नाही. परिणामी आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या भावनेचा कडेलोट होण्यापूर्वी समाजाचे प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेले आहे. कालचे कोल्हापूर येथील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आज सायंकाळी मुंबईत (गुरुवारी) वर्षा निवासस्थानी संभाजीराजे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सायंकाळी ५ वाजता भेट होत आहे. त्यातून ठोस निर्णयाची अपेक्षा मराठा तरुणांना आहे.

Advertisement

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपतींनी पुकारलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनाला बुधवारी कोल्हापुरातून सुरुवात झाली. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार-खासदार तसेच लोकप्रतिनिधी या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला. कोल्हापुरातील १० आमदार, खासदार, मंत्र्यांची या वेळी उपस्थिती होती. याशिवाय प्रकाश आंबेडकर, शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे, संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती आदी आंदोलनात सहभागी झाले.

Advertisement

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सकारात्मक आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तत्काळ मुंबईला यावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घडवून आणण्याची ग्वाही यावेळी उपस्थित मंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार आजची बैठक होत आहे. आता इथे निर्णय न झाल्यास थेट दिल्लीत आंदोलन करण्याची तयारी असल्याचे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.