Take a fresh look at your lifestyle.

त्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय

पुणे : शेतकरी पारतंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुण्यातील किसानपुत्रांनी खासदार गिरीश बापट यांनी भेट घेऊन त्यांना शेतकरीविरोधी कायदे व परिशिष्ट 9 रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक मयुर बागुल आणि नितीन राठोड, किसानपुत्र आंदोलन माहिती तंत्रज्ञान संयोजक असलम सय्यद यांनी आज 17 जून 2019 रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. किसानपुत्र आंदोलनाचे अनंतराव देशपांडे आणि डॉ. राजीव बसर्गेकर हेही या भेटीत सहभागी झाले होते.

Advertisement

शिष्टमंडळाने शेतकरीविरोधी कायदे आणि त्यांना असलेले घटनेच्या 31बी कलमाचे आणि अनुच्छेद 9 चे संरक्षण याची माहिती खासदार गिरीश बापट यांना दिली. ही घटना दुरुस्ती 18 जून 1951 रोजी, मूळ घटना राष्ट्राला अर्पित झाल्यानंतर, आणि निर्वाचित संसद स्थापित व्हायच्या आधी कशी केली गेली याचा संक्षिप्त इतिहास सांगितला. सध्या अनुच्छेद 9 मध्ये 284 कायदे असून त्यातील 250 शेतीशी निगडीत असल्याची माहिती दिली. या कायद्याचा पुनर्विचार संसदेत सभापती यांच्याकडे अर्ज करून देता येतो अशी शक्यता ही सांगितली. खासदार गिरीश बापट यांनी त्याला दुजोरा दिला आणि सांगितले की असे हजाराहून जास्त कालबाह्य कायदे संसदेने रद्द केले आहेत.

Advertisement

शिष्टमंडळाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्या संबंधी अर्ज करावा आणि पुढाकार घ्यावा अशी खासदार गिरीश बापट यांना विनंती केली. त्याच बरोबर यासाठी अजूनही काही माहिती हवी असेल तर ती पुरवण्यासाठी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार गिरीश बापट यांनी शिष्टमंडळातील सर्वांची नावे आणि फोन नंबर नोंद करून घेतले, आणि संपर्क करून सविस्तर बैठक घेण्याची आणि बोलण्याची इच्छा व्यक्त केली. निवेदना बरोबरच यावेळी खासदार गिरीश बापट यांना ‘शेतकरी विरोधी कायदे’ ही पुस्तिका सुद्धा देण्यात आली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.