Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी बाजारभाव; म्हणून दरवाढीला लागला ब्रेक; पहा आजची स्थिती

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमात सवलती देण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता सोने आणि चांदीच्या दरातही घटीचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही दिवसांपासून या दोन्ही धातूंचे दर कमी होत चालले आहेत. आज गुरुवारी तर कमॉडिटी बाजारात सोन्याचे भाव तब्बल ७५० रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दरही ११०० रुपयांनी कमी झाले आहेत.
सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याने आता सोन्याचे भाव ४८ हजारांच्या खाली आले आहेत.

Advertisement

जागतिक बाजारातील घडामोडींचाही परिणाम होत आहे. कारण, सध्या जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर ४७ हजार ७७७ रुपये असे आहेत. यामध्ये ७२९ रुपये कमी झाले आहेत. तसेच एक किलो चांदीचा भाव ७० हजार ३७७ रुपये असून यामध्ये जवळपास १ हजार ११७ रुपयांची घट झाली आहे. याआधी काल बुधवारी मात्र सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. आज पुन्हा दर कमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून बाजारात अशीच परिस्थिती दिसून येत आहे. काही वेळेस दरात वाढ होते तर दुसऱ्याच दिवशी दर पुन्हा कमी होतात. आज मात्र सोन्याचे दर थेट ७५० रुपयांनी कमी झाले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडी तसेच लॉकडाऊनचे निर्बंध कमी होत असल्याचाही परिणाम म्हणून सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार आज गुरुवारी राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ४९० रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. २४ कॅरेटसाठी ५१ हजार ५९० असे दर आहेत. कोलकाता शहरात २२ कॅरेटसाठी ४७ हजार ८३० रुपये तर २४ कॅरेटसाठी ५० हजार ४४० रुपये असा भाव आहे. मुंबई शहरात २२ कॅरेटसाठी ४७ हजार ४०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचे ४८ हजार ४०० रुपये असे नवे दर आहेत. चेन्नई शहरात २२ कॅरेटसाठी ४५ हजार १५० रुपये तर २४ कॅरेटसाठी ४९ हजार २५० रुपये दर आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply