Take a fresh look at your lifestyle.

आलेत की खाली तेलाचे दर; पहा देशभरात कोणत्या तेलाचा भाव किती?

दिल्ली : देशात काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावेळी तेलाचे भाव इतके वाढले आहेत, की कधीही विचार न करणारे नागरिक सुद्धा विचार करू लागले आहेत. केंद्र सरकारला सुद्धा आता गंभीरपणे विचार करावा लागत आहे. खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता सरकारने दावा केला आहे, की मागील एक महिन्यात देशात खाद्यतेलांच्या किमती २० टक्क्यांनी घटल्या आहेत.

Advertisement

भारतात विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात घट होत आहे. मागील एक महिन्याच्या काळात काही खाद्यतेलांच्या किमती जवळपास २० टक्क्यांनी घटल्या आहेत. ७ मे रोजी पाम तेलाचे दर १४२ रुपये प्रति किलो असे होते. आता मात्र दरात १९ टक्के घट झाली असून पाम तेलाचे नवे दर ११५ रुपये झाले आहेत. या प्रकारेच सूर्यफूल तेलाच्या दरात १६ टक्के घट झाली आहे. आता या तेलाचे दर १५७ रुपये असे आहेत. याआधी मे महिन्यात एक किलो सूर्यफूल तेलासाठी १८८ रुपये मोजावे लागत होते. सोयाबीनच्या तेलास जास्त मागणी असते. २० मे रोजी सोयाबीने तेल १६२ रुपये दराने विकले जात होते. आता मात्र मुंबई शहरात १३८ रुपये प्रति किलो असे नवे दर आहेत. मोहरीच्या तेलाच्या किमती १७५ रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. महिन्याभराच्या काळात किमतीत १० टक्के घट झाली. आता मोहरीचे तेलाचे नवे दर १५७ प्रति किलो असे झाले आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisement

शेंगादाणा तेलाच्या आधीच्या किमती १९० रुपये प्रतिकिलो होत्या. आता मात्र १७४ रुपये असे दर आहेत. या तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत, असा दावा करण्यात आला आहे. तेलाच्या किमती कमी होत असल्याचा दावा केला जात असला तरी सध्याची परिस्थिती पाहता तेलांच्या किमती जास्तच आहेत. किमती आणखी कमी होण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

खाद्यतेलांच्या किमती कमी जास्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. जागतिक बाजारातील दर, देशांतर्गत तेलाचे उत्पादन या काही कारणांचा परिणाम होतो. देशात तेलाची मागणी आणि तेलाचे उत्पादन यात मोठी तफावत आहे. त्यामुळे भारतास दरवर्षी मोठ्या प्रमाणात तेल आयात करावे लागते. या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply