Take a fresh look at your lifestyle.

‘असे’ पदार्थ नाश्त्यात खा आणि मस्त राहा; वाचा आरोग्यदायी अशा महत्वाच्या टिप्स

आज प्रत्येकालाच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ताणतणावामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. आरोग्याकडे लक्ष देऊन तंदुरुस्त राहणे प्रत्येकालाच वाटते. मात्र, आरोग्याकडे लक्ष देणे सहसा शक्य होत नाही, निदान आपण आहाराकडे जरी लक्ष दिले तरी आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने ते फायदेशीरच ठरेल. त्यासाठी काही गोष्टींचे पालन केले तर फायदा होईल.

Advertisement

रोजच्या नाश्त्याच्या वेळी पौष्टीक पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जे लोक दररोज नाश्ता करतात ते नाश्ता न करणाऱ्यांच्या तुलनेत वजन कमी करण्यास आधिक सक्षम असतात. नाश्त्यामुळे शरीराचे चयापचय वाढते, ज्यामुळे तुमचा उष्मांक देखील वाढतो. निरोगी न्याहारीमध्ये भाज्या, फळे, कमी चरबीयुक्त डेअरी पदार्थ, लीन प्रोटीन आणि संपूर्ण धान्य इत्यादी बर्‍याच गोष्टींचा समावेश केला पाहिजे. इडलीमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. इडली हा सुद्धा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. इडलीमध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. तेलात तळलेले समोसे आणि इतर पदार्थांपेक्षा हे अधिक चांगले आहे.

Advertisement

उपमा हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. मात्र आपल्याकडे आता नाश्त्यात या पदार्थाचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जात आहे. उपमा हा रव्यापासून तयार केला जातो. वजन कमी करण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त आहे. दररोजच्या नाश्त्यात पोहे खाणे फायदेशीर आहे. पोह्यांमध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी आहे तसेच चरबी देखील नाही. पोह्यामध्ये लोह आणि फायबर अधिक असते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते.

Advertisement

डोसा देखील दक्षिण भारतीय पदार्थ आहे. डोसा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे आपल्या स्नायू आणि हाडांना बळकटी मिळते. या पदार्थात चरबी कमी असल्याने शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. त्यामुळे आता या पदार्थांचा समावेश करण्यास हरकत नाही. अंडी प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे. अंड्यामध्ये जीवनसत्व बी १२ आणि अँटीऑक्सिडेंन्टस ल्युटीन असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. मात्र, अंड्यामध्ये भरपूर चरबी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अंडी कमी खाण्यास सांगितले जाते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply