Take a fresh look at your lifestyle.

भयंकरच की.. जगभरात ‘इतके’ करोनाबळी; पहा नेमका काय दावा केलाय न्यूज रिपोर्टमध्ये

दिल्ली : कोरोना जगात दाखल झाल्यापासून या घातक आजाराने लाखो लोकांचे प्राण घेतले आहे. अजूनही हा विषाणू लोकांचे प्राण घेत आहेत. या आजाराने किती लोकांचा मृत्यू झाला याची माहिती जगातील देशांच्या सरकारी यंत्रणा देत असतात. मात्र, मृत्यूंच्या या आकड्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी दिली जात आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू झाले आहेत, असा दाव केला जात आहे. याबाबत पुन्हा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

जगातील प्रसिद्ध असलेल्या द इकॉनॉमिस्टने जगातील अनेक देश कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची योग्य माहिती देत नसल्याचा दावा केला आहे. जगभरात ७० लाख – १.३ कोटी मृत्यू या आजारामुळे झाले आहेत, असा दावा केला जात आहे. या अहवालात असेही म्हटले आहे, की आफ्रिका आणि आशियातीलच नाही तर अमेरिका आणि युरोपातील देशांनी सुद्धा खरी माहिती दिलेली नाही. आशिया खंडात आतापर्यंत सहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी आधिकृत माहिती आहे. मात्र, या अहवालानुसार आतापर्यंत येथे २४ ते ७१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशांत ६ लाख मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र मासिकाने केलेल्या दाव्यानुसार येथे १५ ते १८ लाख जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. युरोपातील देशात १० लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे. मात्र, येथे १५ ते १६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

भारतातही कोरोनामुळे दररोज साधारण तीन ते चार हजारांच्या दरम्यान मृत्यू होत असल्याचे सरकारी यंत्रणांकडून येते. मात्र, या अहवालाने असा दावा केला आहे, की देशात दररोज ६ ते ३१ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनीही काही दिवसांपूर्वी सांगितले होते, की जगात कोरोनामुळे जितके मृत्यू झाल्याचे आता सांगण्यात येत आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांचे मृत्यू या आजाराने झाले आहेत. या मुद्द्यावर राजकारणही जोरात सुरू आहे. विरोधी पक्ष सरकारवर आरोप करत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची खरी माहिती सरकार देत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सरकार मात्र विरोधकांचे आरोप आणि काही अहवालांनी केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे म्हणत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply