Take a fresh look at your lifestyle.

हेल्थ सेक्टरला मिळणार बुस्टर डोस; वाचा क्रेडिट इन्सेंटिव्ह स्कीममध्ये काय होणार लाभ

दिल्ली : देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघी आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. खासगी आणि सरकारी असा कुठेही वेळेत व योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांचे खूप हाल झाले. हजारो लोकांचे प्राण गेले. त्यानंतर आता केंद्र सरकारने असे पुन्हा होऊ न देण्यासाठी कार्यवाही चालू केली आहे.

Advertisement

आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची योजना आखून त्यावर ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले जात आहे. याअंतर्गत क्रेडिट इन्सेंटिव्ह देऊन सरकारकडून कंपन्यांना नवे रुग्णालय स्थापणे, त्यांचा विस्तार करणे आणि मेडिकल पुरवठ्यासाठी कर्ज निधी उपलब्ध केला जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या स्तरावरील शहरांत भर देऊन भोपाळ, लखनऊ, इंदूर, बडोदा, वाराणसीसाख्या शहरांतील आरोग्य व्यवस्था सक्षम केली जाणार आहे.

Advertisement

योजनेअंतर्गत रुग्णालयांना २ कोटी रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज मिळेल. याची पूर्ण हमी सरकारची असेल. हे कर्ज ७.५% व्याज दरावर दिले जाणार आहे. यासाठी सरकार ग्यॅरंटर होणार आहे. यासह सरकारने कोविडच्या प्रभावापासून सावरण्यासाठी एअरलाइन्स आणि हॉस्पिटल्ससाठी ४१ अब्ज डॉलरच्या आपत्कालीन कर्ज योजनेस मंजुरी दिलेली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply