Take a fresh look at your lifestyle.

तर म्यूकरमायकोसिसचा धोका होतो शून्य टक्क्यापर्यंत कमी; पण ‘हा’ अडसर आहेच की

नाशिक : म्यूकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी याचा संसर्ग ही करोनाच्या दुसऱ्या लाटेमधील एक गंभीर समस्या बनली आहे. अशावेळी आता तिसऱ्या लाटेची चर्चा असताना भविष्यात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्यास काय करावे, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. मात्र, धुळे येथील हिरे रुग्णालयाने म्यूकरमायकोसिसचा धोका होतो शून्य टक्क्यापर्यंत कमी होण्यासाठी महत्वाची शिफारस केली आहे. मात्र, लसटंचाईच्या पार्श्वभूमीवर त्याचा कितपत उपयोग होईल हे पुढील काळात स्पष्ट होईल.

Advertisement

डॉ. पल्लवी सापळे (अधिष्ठाता, हिरे रुग्णालय, धुळे) यांनी म्हटले आहे की, कोरोनासोबत म्यूकरमायकोसिसच्या बाधितांवरही उपचार चालू आहेत. रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यात ३०० रुग्णांची बाह्यरुग्ण कक्षात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करताना माहिती संकलित केली आहे. त्यानुसार असे स्पष्ट होत आहे की, कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेला एकही म्युकरबाधित रुग्ण आढळला नाही. या सर्व रुग्णांची उपचार-केस स्टडीसाठी इत्यंभूत माहिती घेण्यात आली आहे. या डाटाचे विश्लेषण केल्यावर दोन्ही डोस घेणाऱ्यांना म्युकरचा धोका शून्यवत होतो असे आढळले.

Advertisement

म्युकरचे ७० रुग्ण आढळून आले होते. यापैकी सुमारे १७ रुग्णांवर गरजेनुसार लहान-मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतरांना हिरे रुग्णालयाच्या स्टाफने औषधोपचाराने ठणठणीत केलेले आहे. एकूणच केस स्टडीसाठी या रुग्णांची माहिती घेतल्यावर कोरोना प्रलसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाला म्युकरोमायसिस झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आलेला आहे. मात्र, देशातील लसटंचाई लक्षात घेता सर्वांना लस मिळाल्यावरच सर्वांचा धोका तळणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply