Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींना मोदी सरकारने दिलेय ‘हे’ प्रत्युत्तर; पहा नेमका काय केलाय दावा

दिल्ली : कोरोना काळातील केंद्र सरकारच्या कारभारावर विरोधक जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस पक्ष आधिकच आक्रमकपणे टीका करताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींच्या कमतरता लपवण्यासाठी भाजपचे खोटे आणि फसव्या घोषणांची गरज नाही. देशातील सर्व नागरिकांचे तत्काळ लसीकरण करणेच आजच्या घडीस अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यास आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या युवराजांचा भ्रम पसरवण्याचा अजेंडा आता चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

याआधी राहुल गांधी यांनी म्हटले होते, की ‘आजच्या घडीस देशास तत्काळ आणि संपूर्ण लसीकरणाची गरज आहे. मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या लसींची कमतरता लपवण्यासाठी भाजपच्या खोट्या आणि फसव्या घोषणांची गरज नाही.’ ‘पंतप्रधानाची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न कोरोना विषाणू फैलावण्यास कारणीभूत ठरत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत उत्तर दिले. ‘कोविशील्ड लसीच्या डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावरच घेतला गेला आहे. मात्र, आता लसींच्या मुद्द्यावर भ्रम पसरवण्याचा अजेंडा चालणार नाही.’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

Advertisement

दरम्यान, कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. हा निर्णय तज्ज्ञ गटाच्या शिफारसीनुसार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. आता मात्र अशी काही शिफारस केलीच नव्हती, आणि त्यास कोणताच वैज्ञानिक आधार नाही, असे या तज्ज्ञ गटातील शास्त्रज्ञांनी म्हटले होते. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. हा निर्णय कोणाच्या सांगण्यावरुन आणि कशाच्या आधारे घेतला याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुद्धा या मुद्द्यावर केंद्र सरकारवर आरोप केले होते. विरोधकांकडून होत असलेल्या या आरोपांना आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रत्युत्तर देत आहेत. दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply