Take a fresh look at your lifestyle.

चिनी कंपन्यांनी लाखो भारतीयांना लुटले, ‘फेक अ‍ॅप’च्या माध्यमातून कोट्यवधींचा गंडा..!

केंद्र सरकारने अनेक चिनी अ‍ॅपवर बंदी घातली असली, तरी चिनी कंपन्यांच्या कुरापती सुरूच आहेत. ‘फेक अ‍ॅप’ तयार करून या चिनी कंपन्यांनी लाखो भारतीयांच्या थेट खिशात हात घातला आहे.

Advertisement

‘गुगल प्ले स्टोअर’ (Google Play Store)वर अनेक ‘फेक अ‍ॅप’ (fake app)आहेत. खऱ्या आणि ‘फेक अ‍ॅप’मध्ये फारसा फरक दिसत नाही. युजरकडून नजरचुकीने हे ‘फेक अ‍ॅप’ ‘डाऊनलोड’ केले जातात नि ते अलगद सायबर दरोडेखोरांच्या जाळ्यात अडकतात. अशाच एका फेक चिनी अ‍ॅपने 5 लाख भारतीयांचे 150 कोटींहून अधिक पैसे लंपास केल्याचे समोर आले आहे.

Advertisement

त्या तुलनेत ‘अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर'(Apple App Store)ची ‘इको सिस्टम’ (Eco-System) अधिक सुरक्षित मानली जाते. कारण, त्यात ‘डेव्हलपर’ला ‘व्हेरिफिकेशन प्रोसेस’मधून जावं लागतं. त्यानंतरच कोणतेही ‘अ‍ॅप’ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतं..

Advertisement

गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात ‘रिटर्न’ (Return) देण्याचा दावा करीत, लाेकांना लुटणाऱ्या ‘फायनान्शिअल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप्स’चे रॅकेटचा दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. त्यानंतर यामागे चिनी कंपन्यांचा हात असल्याचं समोर आले.

Advertisement

फेक अ‍ॅप कसे ओळखाल..?

Advertisement
  • ‘गुगल प्ले स्टोअर’वर अ‍ॅपचे नाव आणि ‘डेव्हलपर’ कोण आहे, ते पहा. कोणतेही अ‍ॅप ‘सर्च’ करताना मोठी लिस्ट समोर येते. ‘फेक अ‍ॅप’मध्ये ‘स्पेलिंग मिस्टेक’ असते. तसेच, अ‍ॅप डाउनलोड नंबर, रेटिंग, रिव्ह्यूदेखील तपासा.
  • अ‍ॅपची ‘पब्लिश डेट’ तपासा. खऱ्या ‘अ‍ॅप’वर ‘अपडेट्स ऑन डेट’ दाखवते. वेगवेगळे शब्द किंवा ‘इमेज’ मिळाल्यास ‘फेक अ‍ॅप’ ओळखता येऊ शकतं.
  • अ‍ॅप कोणत्या प्रकारच्या ‘परमिशन’ची मागणी करतात, ते तपासा. अधिक ‘परमिशन’ची डिमांड केल्यास, असे अ‍ॅप ‘फेक’ असू शकतात.

Advertisement

Leave a Reply