Take a fresh look at your lifestyle.

आता बोला..! चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी

दिल्ली : कोरोना विषाणू जगभरात पसरण्यास चीनच कारणीभूत असल्याने या देशाची चांगलीच बदनामी झाली आहे. हा घातक विषाणू चीनमधूनच फैलावल्याचा संशय अनेक देशांना आहे. अमेरिकेने तर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. जगातील अनेक शास्त्रज्ञ आणि जागतिक संस्थांच्या अहवालातूनही प्रयोगशाळेतूनच विषाणू लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र चीन काहीच जुमानायला तयार नाही. उलट त्याने आता या सर्व प्रकरणात अमेरिकेलाच दोषी ठरवण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे. कोरोनाच्या उगमाबाबत आता अमेरिकेचीच चौकशी करण्याची मागणी चिनी शास्त्रज्ञांनी केली आहे.

Advertisement

युएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार कोरोना संक्रमित पहिल्या रुग्णाची माहिती समोर येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये किमान सात जण कोरोना संक्रमित आढळले होते. आता चीनने याच अहवालाचा आधार घेत अमेरिकेवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. याआधीही चीनने अमेरिकेवर आरोप केले होतेच आता मात्र अहवाल मिळाल्याने अमेरिकेची कोंडी करण्याची संधी चीनला मिळाली आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेशनचे मुख्य साथरोग तज्ज्ञ जेंग गुआंग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले, की कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत सुरू असलेल्या तपासण्या आता अमेरिकेतही कराव्यात. जैव प्रयोगशाळा संबंधित सर्व मुद्द्यांची चौकशी करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर अमेरिकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही. तसेही अमेरिका मान्य करणार नाहीच. उलट दोन्ही देशांतील वाद आधिकच वाढत जाणार आहे. कारण, कोणीही माघार घेण्यास तयार नाही. चीनने या अहवालाच्या आधारे आरोप केले असले तरी देश त्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता कमीच आहे. कारण, कोरोनाच्या मुद्द्यावर चीन सुरुवातीपासूनच खोटे बोलत आहे. आणि अजूनही जगाची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. चीनचा हा विश्वासघातकी स्वभाव जगाच्या लक्षात आला आहे. त्यामुळे कोणता देश चीनवर विश्वास ठेऊन अमेरिकेच्या विरोधात जाईल, असेही होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.