Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अवघडचं हाय की.. ‘अदानी’वर आहे इतके भलेमोठे कर्ज..! पहा रिलायन्सची काय स्थिती ते

मुंबई : अनेकदा आपल्या गावात, गल्लीत किंवा नातेवाईकांमध्ये श्रीमंत असलेल्या मंडळींवर दणकून कर्ज असते. तसलाच प्रकार देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या बाबतीत आहे. देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप कर्जमुक्त असतानाच अदानी समूहाने कर्जाची उंची वाढवली आहे.

Advertisement

होय, या अदानी समूहावर तब्बल 1.41 लाख कोटी रुपयांचे मोठे कर्ज आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नुकत्याच आलेल्या घसरणीआधी गौतम अदानी लवकरच देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होतील अशा वावड्या उठत होत्या. मात्र, त्यालाच या घसरणीने ब्रेक लावला आहे. नव्हे, यानिमित्ताने या ग्रुपचे वास्तव समोर आलेले आहे. उद्योगपतींच्या स्थितीसाठी त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल हेच एकमेव मानक समजले गेल्यामुळे हा गैरसमज झालेला आहे.

Advertisement

बाजार भांडवलाऐवजी व्यवसायाचे वास्तविक आकडेवारीवर (उदा. समूहाचा महसूल, शुद्ध नफा, कर्ज आदी) विचार केल्यास बहुतांश आघाड्यांवर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांची स्थिती रिलायन्ससमोर अगदीच किरकोळ ठरते. कारण, जिथे अंबानीच्या ग्रुपवर एकाही रुपड्याचे कर्ज नाही, तिथे अदानी ग्रुप कर्जमय झालेला आहे. अदानी समूहाचा एकूण महसूल रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा साडेसहा पट कमी आहे. याच पद्धतीने दोन्ही समूहांच्या शुद्ध नफ्यातही साडेसहा पटीपेक्षा जास्त अंतर आहे.

Advertisement

अल्टामाउंट कॅपिटल मॅनेजमेंटचे संचालक प्रकाश दिवाण यांनी बाजार भांडवल हे कोणत्याही कंपनीचे मूल्य नसते असे म्हटले आहे. म्हणजेच एखाद्या कंपनीचे शेअर वधारल्यामुळे तिचे बाजार भांडवल वाढल्यास कंपनीचे मूल्य वाढले असा कदापि अर्थ होत नाही. एलकेपी िसक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन म्हणाले,कोणती कंपनी किती मोठी वा चांगली याचा अंदाज बांधण्यासाठी बाजार भांडवलाशिवाय अन्य मानकांवर लक्ष दिले पाहिजे. त्यात बाजारात कंपनीची पोहोच, ग्लोबल फुटप्रिंटचा समावेश आहे.

Advertisement
निकष रिलायन्स अदानी
महसूल 5 लाख 2 हजार 653 77 हजार 520
शुद्ध नफा 53 हजार 739 8 हजार 42
कर्ज 1.41 लाख कोटी सध्या कर्जच नाही

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply