Take a fresh look at your lifestyle.

अर्रर्रर्र.. ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना घातले मातीत..! पहा कितीचा फटका बसलाय..?

शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे लॉटरीच.. लागली तर मालामाल, नाहीतर कंगाल..! अशाच एका कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदाराचे दिवाळं काढलं. हा नेमका कोणता शेअर आहे, कशामुळे गुंतवणूकदारावर ही वेळ आली, हे आपण जाणून घेऊ या..

Advertisement

.. तर या कंपनीचे नाव आहे, डीएचएफएल(DHFL).. या कंपनीने 8 जून 2021 रोजी केलेल्या घोषणेनुसार, एक्सेंजला एनसीएलटी (NCLT) च्या मुंबई बेंचकडून रिझॉल्युशन प्लानच्या अप्रुवलबाबत माहिती दिली गेली. यात कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या डिलिस्टिंगबाबत माहिती दिली होती.

Advertisement

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) यांनी DHFL कंपनीचे शेअर ट्रेडिंग बंद केले. या स्टॉक्सची क्लोजिंग प्राईस 11 जूनला निश्चित केली आहे.

Advertisement

‘पिरॅमल ग्रुप’ने ‘डीएचएफएल’साठी बोली लावली. त्यात एनसीएलटी (NCLT) कडून जी स्कीम अप्रुव्ह केली होती, त्यात डीएचएफएलच्या (DHFL) शेअर्ससाठी झिरो प्राईस निश्चित केली गेली, तरी ट्रेडिंगसाठी परवानगी दिली गेली.

Advertisement

बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) च्या सर्क्युलरनुसार डीएचएफएल (DHFL) ने 9 जून रोजी असं म्हटलं की, इंडिया इन्सॉल्विसी एँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेटसाठी दिवाळे समाधान प्रक्रिया) अंतर्गत नियुक्त रजिस्टर्ड वॅल्युअर्सकडून अनुमानित कंपनीच्या लिक्विड वॅल्यूच्या आधारे ‘इक्विटी शेअर्स’साठी कोणतही मूल्य ठरवलं गेलं नाही.

Advertisement

‘डीएचएफएल’च्या शेअर्सवर या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्रेडिंगची परवानगी देण्यात आली होती. ज्यात 10 टक्के वाढ करण्याची परवानगीही कंपनीला मिळाली होती. एकट्या एनएसई (NSE) वर 14 कोटी शेअर्सची ट्रेडिंगदेखील झाली. गुंतवणूकदारांनी 8 जूनला 9 कोटी शेअर्सची डिलिव्हरी घेतली, ज्याची क्लोजिंग किंमत 200 कोटी एवढी होती. मात्र, आता या कंपनीचे शेअर ट्रेडिंग बंद करण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply