Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आघाडी तर बिघाडीच्या मार्गावर? पहा कोणत्या मुद्द्यावर काँग्रेसचे मंत्री झालेत भयंकर आक्रमक..!

मुंबई : करोनाचे संकट आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अडचणीत आलेल्या महाविकास आघाडी या तीन पक्षीय आघाडी सरकारच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हा भार टाकला आहे आघाडीचा घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेसने. एका मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका न पटलेल्या काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी राज्यभर मुद्दा पेटवण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पदोन्नतीच्या आरक्षणावर २१ जून नंतर बोलणार असून या विषयावर महाराष्ट्र ढवळून काढणार असल्याची आक्रमक घेष्ण केली आहे. त्यामुळे या तीन पक्षांच्या सरकारमध्ये असलेला तणाव आणखी वाढणार आहे. आरक्षण थांबवून अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्यामुक्त जाती आणि बहुजन मागास समाजाला वेठीस धरणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल करून डॉ राऊत यांनी याप्रकरणी राजकीयदृष्ट्या ठाम भूमिका घेण्याचे सुतोवाच केले आहे.

Advertisement

ओबीसी समाजाचे आरक्षण असो, की मराठा समाजाचे आरक्षण असो. आरक्षण हे ज्या कारणास्तव देशाच्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलं, त्या कारणास्तव देत असताना बहुजन मागास समाजाला वेठीस धरले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र मराठवाडा जिल्ह्याचा दौरा करत असताना जाणवल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Advertisement

Advertisement

मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्णपणे समर्थन दिले आहे. परंतु ते समर्थन करत असताना राज्य सरकार हे आरक्षण प्रश्नी अपयशी ठरतेय असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य आहे असं मला वाटत नाही, असेही मंत्री राऊत यांनी म्हटले आहे. एकूणच आरक्षणाचा मुद्दा ठाकरे-पवार सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरेल असेच चित्र आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply