Take a fresh look at your lifestyle.

पहा नेमके काय म्हणतोय चीन; ‘नाटो’च्या महत्वाच्या मुद्द्यावर भडकला नाठाळ देश

दिल्ली : चीनला आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही देशाचे नुकसान करण्यास काहीच वाटत नाही. शेजारी देशांबरोबर चीनचा वाद कायमच सुरू आहे. चीनच्या कुरापतींनी अनेक देश बेजार झाले आहेत. मात्र, चीनचे उद्योग काही केल्या कमी होत नाहीत. आता तर चीनची दादागिरी आधिकच वाढली आहे. त्यामुळे जगासाठी चीन जास्तच धोकादायक ठरू लागला आहे.

Advertisement

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘नाटो’ ने (नॉर्थ अटलांटीक ट्रिटी ऑर्गनायजेशन) चीनला डिवचले आहे. जागतिक सुरक्षिततेसाठी चीन धोकादायक बनला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारीत व्यवस्थेत कमजोर करण्याचे कामही चीन करत आहे, असे म्हटले आहे. ब्रुसेल्स येथे आयोजित शिखर परिषदेत नाटोच्या नेत्यांनी असे म्हटले होते. यानंतर मात्र चीनचा जळफळाट झाला असून त्याने सुद्धा तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चीन नेहमी शांततेसाठी प्रयत्न करतो, आणि स्वसंरक्षणासाठी आम्ही पूर्णपणे तयार सुद्धा आहोत, असे चीनने म्हटले. नाटोने दिलेले वक्तव्य चीनला जगात बदनाम करणारे आहे. नाटोतील सदस्य देशांच्या तुलनेत चीन आपल्या सैन्यावर अत्यंत कमी खर्च करतो. चीन शांतता कायम ठेवण्याचा अधिकार कधीही सोडणार नाही.

Advertisement

Advertisement

तसेही करोनाने चीनला जगभरात बदनाम केले आहे. करोना प्रकरणी चीनच्या बेजबाबदारपणाची किंमत आज सगळ्या जगालाच मोजावी लागत आहे. त्यामुळे चीनच्या विरोधात आता लहान देशही उघडपणे बोलत आहेत. करोनाच्या उत्पत्तीबाबत तपासणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जगातील मोठ्या देशांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चीनवर दबाव वाढत चालला आहे. मात्र, तरी सुद्धा चीनच हेकेखोरपणा कमी झालेला नाही. याकडे दुर्लक्ष करत कुरापती काढण्याचे या देशाचे उद्योग आजही सुरुच आहेत. जागतिक राजकारण आता बदलले आहे. चीनच्या विरोधात अनेक देश एकत्र येत आहेत. चीनच्या वाढत्या दादागिरीचा बंदोबस्त करण्यासाठी रणनिती तयार करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या या घडामोडींमुळे चीनची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

Advertisement

चीनचा विरोध करण्यात अमेरिका सध्या आघाडीवर आहे. जी ७ राष्ट्रांच्या संमेलनातही चीन विरोध दिसून आला. चीनला घेरण्यासाठी या संमेलनात खास रणनिती तयार करण्यात आली. चीनची कायमच पाठराखण करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा चीनला स्पष्ट इशारा देत कोरोना विषाणूच्या उत्पत्ती बाबत सुरू असलेल्या शोधकार्यात सहकार्य करण्यास सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.