Take a fresh look at your lifestyle.

कंडोम बॉम्बमुळे इस्त्राईल हैराण; पहा नेमका काय प्रकार आहे हा, पुन्हा फुटले युद्धाला तोंड?

दिल्ली : इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावग्रस्त झाली आहे. पॅलेस्टाईनच्या अतिरेकी गट हमासने चिथावणी देण्यासाठी कंडोम बॉम्ब सोडल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बहल्ला केला आहे. एकूणच काही चिथावणीखोर माथेफिरूंच्या कृत्याने आता पुन्हा एकदा पॅलेस्टाईनमधील सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन जगावे लागणार आहे.

Advertisement

यापूर्वी मे महिन्यात अनेक दिवस संघर्षानंतर दोन्ही बाजूंनी युद्धबंदी झाली होती. मात्र, आता इस्राईलचे म्हणणे आहे की, हमासकडून ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटकांनी भरलेले कंडोम हवेत सोडून हल्ले केले जात आहेत. त्यानंतर इस्त्रायली हवाई दलाच्या विमानाने बुधवारी पहाटे गाझा पट्टीतील अतिरेक्यांच्या जागांवर हल्ला केला. गेल्या महिन्यात हमासबरोबर युद्धबंदीनंतरचा हा हल्ला होण्याचा पहिलाच प्रकार आहे. इस्त्रायली सैन्याने सांगितले की, हल्ल्यात अशी केंद्रे लक्ष्य केली होती जी हमास अतिरेक्यांनी हल्ल्याची योजना आखण्याच्या उद्देशाने बैठकीसाठी वापरली जातात.

Advertisement

Advertisement

हमास या अतिरेकी गटाचे सदस्य कंडोम फुगवून त्याला कोळशासारख्या ज्वलनशील पदार्थांनी भरून नंतर त्यांना इस्रायलच्या भागात उडवून देतात. जेव्हा हे ‘बलून’ फुटतात तेव्हा त्या ठिकाणी आग लागते. इतकेच नव्हे तर अनेक कंडोममध्ये स्फोटक पदार्थदेखील भरले जातात. ज्यामुळे ते कोठे पडतात तेथे स्फोट होतो. दक्षिणी इस्त्राईलमध्ये या बलूनमुळे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. टाइम्स ऑफ इस्राईलच्या अहवालानुसार या कंडोम बलूनमुळे इस्राईलमध्ये हजारो एकर पिके नष्ट झाली आहेत. यामुळे लोकांचे बरेच हाल झाले आहेत. इस्त्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार या कंडोम बलूनचा हेतू लोकांना मारणे आणि मोठा विनाश करणे हाच आहे. मुले बर्‍याचदा या बलूनच्या तावडीत पडतात. मुले त्यास स्पर्श करतात किंवा लोभात अडकून ते मिळविण्यासाठी धावतात. या स्फोटांमध्ये अनेक इस्त्रायली मुलेही जखमी झाली आहेत.

Advertisement

कंडोम बलून व्यतिरिक्त पतंगदेखील स्फोटकांनी सुसज्ज केलेले आहेत. पतंग पडण्यामुळे इस्त्रायली भागात भीषण आग लागते. या बलूनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिल्या जातात किंवा ते कंडोममध्ये हवा भरून तयार केले जातात. आय लव्ह यू असेही काहीनाव्र लिहिले आहे. जेणेकरून लोक त्याच्या लोभामध्ये अडकतील आणि स्फोटात अडकतील. हे बलून आल्यावर पोलिसांनी नियंत्रित पद्धतीने त्यांचा स्फोट केला आणि त्यांना उडवून दिले. कंडोमच्या वापरामुळे बर्‍याच दिवसांपासून हा प्रश्न उद्भवत आहे की ते कोठून आले आहे. इस्त्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार कधीकधी एकच फुगा असतो आणि काहीवेळा मोठ्या संख्येने फुगे एकाचवेळी उडवले जातात. जेणेकरून इस्त्राईलच्या भूभागावर भारी स्फोटक साहित्य सोडता येईल. हमासच्या या कार्यात भूमध्य समुद्राकडून येणारे जोरदार वारे खूप मदत करतात. तज्ञांच्या मते बलून किंवा कंडोमपासून बनविलेले स्फोटके हवेतल्या हवेत उडवणे सोपे नाही. यामुळे या हल्ल्यांमध्ये हमासचे सदस्य बर्‍यापैकी यशस्वी झाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply