Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण आंदोलन : अशी आहे आचारसंहिता; पहा कोण होत आहे आंदोलनात सहभागी

कोल्हापूर : राज्य सरकारने दिलेले आणि सर्वोच्च न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आज त्यासाठी महाराष्ट्र राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. आज बुधवारी कोल्हापुरातून अांदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार अाहे. खासदार संभाजी शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक अांदोलन करण्यात येईल. यासह औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि रायगड अशा राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार अाहे.

Advertisement
आंदोलनासाठी आचारसंहिता
काळ्या रंगाची वेशभूषा
दंडावर काळी फीत
अन् काळा मास्क अनिवार्य
पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री
सोबत सॅनिटायझर अावश्यक
इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन न करणे
कोरोनाचे नियम कसोशीने पाळणे

 

Advertisement

राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळी काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्याचे नियोजन आहे. आंदोलनात वंचित बहुजन अाघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हेसुद्धा सहभागी होतील. आंदोलनासाठी मंत्री, खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात अाले असून मूक आंदोलनानंतर मुंबईत विधान भवनावर लाँग मार्च काढण्यात येईल. यावेळी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने अाचारसंहिताही जाहीर करण्यात अाली आलेली आहे.

Advertisement

Advertisement

जिल्हावार बैठका घेण्यात येणार अाहेत. लाँग मार्चबाबत बुधवारी चर्चा व घोषणाही होण्याची शक्यता आहे. आंदोलनास कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अामदार-खासदारांनी पाठिंबा दिला अाहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी बोलतील, आम्ही ऐकू, असे संभाजीराजे यांनी मंगळवारी सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply