Take a fresh look at your lifestyle.

तर पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी; पहा मागण्यांबाबत काय म्हटलेय गृह राज्यमंत्री देसाई यांनी

मुंबई : मंत्रालयात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पोलिस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिस पाटलांच्या विविध मागण्यांवर  या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Advertisement

गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारा महत्वपूर्ण घटक हा पोलिस पाटील होय. कोरोना काळात पोलिस पाटील यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कौतुकास्पद कार्य केले आहे, पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे त्यावर गृह विभागाने त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश देसाई यांनी  दिले. राज्यमंत्री देसाई म्हणाले की, पोलिस पाटील यांनी कोरोना  कालावधीत अत्यंत जबाबदारीने फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिस पाटलांची असते. कोरोना काळात काळात पोलिस पाटलांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी खूप चांगल्या पध्दतीने पार पाडली असून या कामाचे कौतुकही देसाई या बैठकीदरम्यान केले.

Advertisement
पोलिस पाटलांच्या मागण्या
पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करणे
शासनातर्फे विमा योजना सुरू करणे
निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे
निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे
अनुकंपा तत्व लागू करणे
कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे
शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता, प्रशिक्षण व इतर योजनांची अंमलबजावणी करणे
इतर गावांचा अतिरिक्त कार्यभार दिल्यास त्याचा अतिरिक्त भत्ता मिळावा
पोलिस पाटील कोव्हीड काळात मृत्युमुखी पडल्यास शासन निर्णयानुसार ५० लाख रुपये भरपाई मिळावी

 

Advertisement

या प्रमुख दहा मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. गृह विभागाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवून कार्यवाही करावी असे यावेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply