Take a fresh look at your lifestyle.

मोदीराज्यात इंधन दरवाढ सुसाट; पहा कोणत्या ‘त्या’ ठिकाणी पेट्रोल झालेय १०७ रुपये लिटर

मुंबई : इंधनाच्या किमतीत वाढ सुरुच असून सरकार सध्या तरी नागरिकांना कोणताच दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाही. एकीकडे करोनाचा त्रास तर आहेच मात्र, दुसरीकडे महागाईचे तडाखे सहन करावे लागत आहेत. खाद्यतेलांच्या किमती भरमसाट वाढल्या. डाळी आवाक्याबाहेर गेल्या.. जवळपास सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले, त्यात आता पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीने मोठी भर घातली आहे.

Advertisement

काही केल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. आजही पेट्रोलियम कंपन्यांनी दर वाढवले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलच्या दरात १३ पैसे दरवाढ झाली आहे. त्यामुळे देशात काही शहरात पेट्रोलने शंभरचा आकडा पार केला आहे. मध्य प्रदेशातील अनुपनगरमध्ये तर पेट्रोल आता १०७.४३ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. रीवा शहरात सुद्धा १०७.०७ तर राजस्थानमधील श्रीगंगानगर शहरात १०७.७९ रुपये पेट्रोलचे दर आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “करोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’ प्रकरण; पहा RTI ची कमाल..! @krushirang https://t.co/faKh8RyFaR” / Twitter

Advertisement

इंधनाच्या किमती दररोज सकाळी सहा वाजता बदलत असतात. आजही किमती वाढल्या आहेत. किमती कमी होऊ शकतात. मात्र, सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. इंधनावरील एक्साइज ड्युटी, डिलर्सचे कमिशन, तसेच अन्य प्रकारच्या कमिशनमुळे इंधनाच्या किमती दुप्पट होतात. यामुळेच शेजारील देशांच्या तुलनेत आपल्या देशात इंधनाच्या किमती जास्तच आहेत. याद्वारे सरकारलाही भरघोस मिळतो. त्यामुळे लोकांनी कितीही ओरड केली तरी दर कमी करण्याचा विचार सहसा होत नाही. निदान आपल्या देशात तरी असेच आहे.

Advertisement

करोनाच्या काळात सगळ्यांनाच त्रास होत आहे. महागाईचे संकटही आले आहे. या संकटात सर्वसामान्य नागरिक आधिकच भरडले जात आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात जनतेत रोष वाढत चालला आहे. महागाई कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्याची आज अत्यंत गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, असे काहीच होत नाही. आता तर विमान प्रवास दरात वाढ करुन सरकारने आणखी एक झटका दिला आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय करोनामुळे संकटात सापडलेल्या विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आला आहे. म्हणजेच, महागाईच्या संकटात होरपळणाऱ्या नागरिकांनाच आता विमान कंपन्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने महागाई सुद्धा वाढली आहे. देशातील नागरिकांना या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल थेट १०७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या दरवाढीने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.