Take a fresh look at your lifestyle.

कांदा झटका : मोदी सरकारने दिलेत ते महत्वाचे आदेश; पहा कसा बसणार उत्पादकांना फटका

नाशिक : देशात कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. काही राज्यात कांद्याचे उत्पादन कमी होते. त्यामुळे या राज्यांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांना कांद्याचे उत्पादनात वाढ करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने दिल्या आहेत. यंदा साधारण ९ हजार हेक्टर जास्तीच्या क्षेत्रावर कांदा लागवड करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे.

Advertisement

देशात खरीप हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात कांद्याचे मोठे क्षेत्र आहे. बाहेरच्या देशांनाही कांदा निर्यात केला जातो. असे असले तरी काही नैसर्गिक संकटे निर्माण होऊन कांदा कमी प्रमाणात आला तर पुढे सर्वच नियोजन बिघडते. कांद्याची कमतरता निर्माण होऊन भाव वाढतात. त्यामुळे या शक्यता विचारात घेऊन केंद्राने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांना कांदा उत्पादन वाढवावे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. या राज्यात मागील वर्षाच्या खरीप हंगामात साधारण ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती. आता मात्र या हंगामात यामध्ये किमान दहा हजार हेक्टर क्षेत्र वाढवण्याचे सरकारचे नियोजन आहे. यंदाच्या खरीप हंगामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यावेळी पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच दिला आहे. त्यामुळे पाण्याची काळजी मिटली आहे.

Advertisement

केंद्र सरकारने या राज्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या राज्यांना नियोजन करावे लागणार आहे. खरीप हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात कांद्याचे क्षेत्रात वाढ करण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यानुसार खते आणि बियाण्यांचे नियोजन करावे लागणार आहे. या पाच राज्यांतील चार राज्यांत भाजपचे सरकार आहे. त्यामुळे या राज्यात विरोध होण्याची शक्यता नाही. दरम्यान, भारता प्रमाणेच अन्य पाकिस्तान, श्रीलंका या देशातही कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या देशातील कांदा सुद्धा बाजारात येत असतो. काही वेळेस हा कांदा स्वस्त असतो, त्यामुळे भारताच्या कांद्यास मागणी कमी होते. त्याचा फटका बसतो. तसेच देशांतर्गत कांद्याचे उत्पादन कमी झाले तर टंचाई निर्माण होऊन भाव वाढतात. त्यामुळे या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने यंदा सरकारने कांद्याचे क्षेत्रात वाढ करण्याचा विचार केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply