Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण आंदोलन : आजारी असूनही ‘ते’ आमदार-खासदार आलेत आंदोलन स्थळी..!

कोल्हापूर : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने या निकालाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आज याप्रकरणी मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेऊन लोकप्रतिनिधींनी आता हा प्रश्न निकाली काढण्याचे आवाहन केले आहे. त्यास अनेकांनी आपला पाठींबा दिलेला आहे.

Advertisement

आजारी असतानाही खासदार धैर्यशील माने आंदोलनात सहभागी झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी झाली होती करोनाची बाधा झालेली होती. तर, ताप असतानाही आमदार चंद्रकांत जाधव आंदोलन स्थळी आलेले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे. २८८ आमदार, ४८ खासदारांचा पाठिंबा असताना आरक्षण का मिळत नाही? पुरोगामी विचारांची भूमी आहे. या भूमीतून आंदोलनाला मोठी ताकद मिळेल असे खासदार माने यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठा_आरक्षण #आरक्षण #आंदोलन : संभाजीराजे यांनी घेतली ‘ही’ महत्वाची भूमिका; पहा नेमके काय चालू आहे #कोल्हापूर मध्ये @krushirang https://t.co/C0XrpOR5u1” / Twitter

Advertisement

आमदार विनय कोरे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळले आहे. त्यात समन्वय कायम ठेवून हा प्रश्न मिटवण्याची गरज आहे. तर, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मराठा आरक्षणासाठी निर्णायक असून, लोकप्रतिनिधी ताकतीने उतरत आहेत. सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक होऊन यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे असे म्हटलेले आहे. आंदोलनाला सुरुवात होण्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. संभाजीराजेंनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत, त्यातील बहुसंख्य मागण्या राज्य सरकारच्या पातळीवर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे आवाहन प्रकाश आवाडे यांनी केलेले आहे.

Advertisement

Chandrakant Patil on Twitter: “५ जुलैपासून विधानसभा व विधानपरिषद अधिवेशन आहे. @Dev_Fadnavis सरकारने मराठा समाजाला दिलेल्या सवलतीसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी,पहिल्याच क्षणाला, राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पेटून उठलं पाहिजे ! @CMOMaharashtra https://t.co/Hgn9W5m6IZ” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply