Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण आंदोलन : संभाजीराजे यांनी घेतली ‘ही’ महत्वाची भूमिका; पहा नेमके काय चालू आहे कोल्हापूरमध्ये

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या मूक आंदोलनास कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत.

Advertisement

राज्य सरकारने दिलेले आणि सर्वोच्च न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आज त्यासाठी महाराष्ट्र राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. कोल्हापूरसह औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि रायगड अशा राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार अाहे. त्यानुसार सर्व आचारसंहिता पालन करून आंदोलनास सुरुवात झाली आहे.

Advertisement

Advertisement

आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी बोलतील, आम्ही ऐकू, अशी महत्वपूर्ण भूमिका संभाजीराजे यांनी घेतलेली आहे. कोल्हापुरात सध्या पाऊस चालू आहे. भार पावसात सध्या या आंदोलनास सुरुवात झालेली आहे. राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक हे देखील पोहोचले आहेत. काहीजण काळा रेनकोट तर काहीजण काळा पोशाख घालून आंदोलनस्थळी आलेले आहेत.

Advertisement
आंदोलनासाठी आचारसंहिता
काळ्या रंगाची वेशभूषा
दंडावर काळी फीत
अन् काळा मास्क अनिवार्य
पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री
सोबत सॅनिटायझर अावश्यक
इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन न करणे
कोरोनाचे नियम कसोशीने पाळणे

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply