Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण : म्हणून मोदींच्या मनातील भावना महत्वाची; पहा नेमके काय म्हटलेत शाहू महाराज यांनी

कोल्हापूर : राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्याने सध्या कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन चालू आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा कायदा न टिकल्याने आता सर्वांच्या नजरा थेट केंद्र सरकारकडे लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज शाहू महाराज यांनी याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना महत्वाची असल्याचे सूचित केले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने हा विषय मनावर घेतला तर आरक्षणाचा प्रश्न लवकर सुटणार आहे. त्यासाठी पंतप्रधानांच्या मनात काय आहे हे कळायला पाहिजे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीत सांगितले. एकमुखाने सर्वांनी हा लढा द्यायला हवा. समाजाचा आवाज आवाज आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईपर्यंत पोहोचला आहे. पण आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा. राज्य सरकार आपल्या सोबत आहे यात जराही शंका नाही. आता केंद्र सरकारनं हा विषय मनावर घ्यावा.

Advertisement

Krushirang on Twitter: “करोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’ प्रकरण; पहा RTI ची कमाल..! @krushirang https://t.co/faKh8RyFaR” / Twitter

Advertisement

कुठलाही एक माणूस ही लढाई लढू शकणार नाही, त्यामुळे खासदार संभाजीराजांना आता सर्वांनी ताकद देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सध्या यावर राज्यभरात चर्चा चालू आहेत. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी आता केंद्राकडे आरक्षणाचा चेंडू टोलवला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply